Government Bank Merged: मोठी बातमी! देशातील १२ सरकारी बँकांचे विलीनीकरण होणार; फक्त ४-५ बँकाच राहणार

12 Government Bank Merged: सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. देशातील १२ सरकारी बँकांचे विलिनीकरण केले जाणार आहे. याबाबत आज बैठक होणार आहे.
Government Bank Merged
Government Bank MergedSaam Tv
Published On
Summary

देशातील १२ सरकारी बँकांचे विलिनीकरण होणार

देशात फक्त ४-५ सरकारी बँका

आजपासून सरकार आणि सार्वजनिक बँकांमध्ये महत्त्वाची बैठक

देशातील १२ बँकांच्या विलिनकरणासाठी महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे. मोदी सरकारने बँकांच्या विलिनिकरणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या विलिकरणाला बँकेच्या कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. मात्र, याविषयी सरकार आणि सार्वजनिक श्रेत्रातील बँकांमध्ये बैठक होणार आहे. दोन-तीन दिवस ही बैठक होणार आहे.

Government Bank Merged
HDFC Bank : HDFCच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; २३ ऑगस्टला काही सेवा राहणार बंद

देशात फक्त ४-५ सरकारी बँका

सरकार आणि सार्वजनिक श्रेत्रातील बँकांमधील बैठक आज आणि उद्या होणार आहे. या बैठकीत बँकिंग सुधारणेवर चर्चा होणार आहे. जवळपास दोन वर्षांनी ही अशी बैठक होणार आहे. यामध्ये बँकिंग क्षेत्रातील रोडमॅप, आकार, जागतिक स्पर्धेतील रणनीती, एआय, ग्राहकांसाठीची सेवा याविषयीची चर्चा होणार आहे. या बैठकीला आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर उपस्थित असणार आहे.

Government Bank Merged
UCO Bank: HDFC नंतर या बँकेचा मोठा निर्णय! कर्जावरील व्याजदर घटवले; EMI कितीने कमी होणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी बँकांच्या विलिनीकरणाची चर्चा या बैठकीत होणार आहे. देशातील १२ सरकारी बँकांचे विलिनीकरण करण्यात येणार आहे. फक्त ४ ते ५ सरकारी बँका सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक दर्जावर बँकिंग क्षेत्रालाही या स्पर्धेत उतरवण्यासाठी सरकारी मोठी तयारी करत आहेत.

सरकारी बँकांची संख्या २७ वरुन १२

२०२० मध्येच मोदी सरकारने बँकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु केली होती. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७ वरुन १२ आली आहे. आता या बँकांचेबी विलिनीकरण करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकार महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याचे सांगितले जात आहे.

Government Bank Merged
Bank Jobs: बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरीची संधी; मिळणार पगार १,५६,५०० रुपये; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com