Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, त्या सर्व खासदारांचं निलंबन होणार रद्द

Parliament Budget Session: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अर्थसंपल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. १ फ्रेब्रूवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लेखानुदान सादर करतील.
Budget Session
Budget SessionSaam TV
Published On

Suspension of MP Will be Cancelled:

बुधवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यावेळी सर्व खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजर राहता यावे यासाठी निलंबित खासदारांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिलीये.

Budget Session
MP Crime News: पती, पत्नी अन् मुलगा, एकाच कुटुंबातील तिघांनी संपवले आयुष्य; भयंकर घटनेचे धक्कादायक कारण समोर

प्रल्हाद जोशींनी माध्यामांशी संवाद साधताना पुढे म्हटलं की, निलंबित असलेल्या सर्वच खासदारांचं निलंबन मागे घेतलं जाणार आहे. मी स्वत: याबाबत लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा अध्याक्षांशी संवाद साधला आहे. तसेच निलंबन रद्द करण्याची विनंती केली आहे. विशेषाधिकार समित्यांशी संवाद साधून निलंबन रद्द करून खासदारांना पुन्हा एक संधी द्यावी अशी विनंती केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अर्थसंपल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. १ फेब्रूवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लेखानुदान सादर करतील. अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंगळवारी सर्वक्षीय बैठक घेण्यात आलीये.

संसदेत १३ डिसेंबर रोजी घुसखोरीचं प्रकरण झाल्यानंतर प्रचंड गोंधळ घालण्यात आला. गोंधळ सुरू असताना काही खासदार पीठासीन अधिकाऱ्यांच्या खुर्चीपर्यंत पोहचले होते. यावेळी लोकसभेच्या १०० आणि राज्यसभेच्या ४६ सदस्स्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Budget Session
Jaipur Crime News: अमानुषतेचा कळस! नातेवाईकानेच केला धावत्या बसमध्ये १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, जयपूरमधील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com