संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी संसदेतील सदस्यांना संबोधित केलंय. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या विकासकामांचा पाढाच वाचून दाखवला. अयोध्येतील राम मंदिराचाही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रामाचा उल्लेख होताच संसदेत सत्ताधारी पक्षाकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी देखील बेंच वाजवत जल्लोष केला. राम मंदिराची (Ram Mandir) निर्मिती ही अनेक शतकांपासूनची आकांक्षा होती, असं राष्ट्रपती द्रोपती मुर्मू आपल्या अभिभाषणात म्हणाल्या.
यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मंत्र्यांनीही सभागृहाच्या टेबलला टॅप करून संबोधित केलेल्या भागाबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी अनेक सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणाही दिल्या. यामुळे राष्ट्रपतींना काही मिनिटासाठी भाषण थांबवावे लागले. (Latest Marathi News)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, "आपण सर्वजण लहानपणापासून गरीबी हटवण्याचे नारे ऐकत आलो आहोत. पण या सरकारने खरोखरचं गरीबी हटवण्याचं काम केलंय. निती आयोगाच्या म्हणण्यानुसार, एका दशकाच्या कार्यकाळात सुमारे 25 कोटी देशवासी गरीबीतून बाहेर आले आहेत, असं राष्ट्रपतींनी सांगितलं.
राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याचाही उल्लेख केला. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत शंका होत्या. पण, आज तो इतिहास आहे. याच संसदेने तिहेरी तलाकविरोधात कठोर कायदा केला आहे. शेजारील देशांतून येणाऱ्या अत्याचारित अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणारा कायदा केला आहे. तसेच वन पेन्शनही लागू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.