Union Budget 2024: PM मोदींचा मोठा खुलासा, कसं असेल यंदाचं बजेट? माध्यमांसमोर सांगूनच टाकलं

PM Narendra Modi News: अर्थसंकल्पाच्या एक दिवसआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाबाबत मोठा खुलासा केला.
PM Narendra Modi News
PM Narendra Modi NewsSaam TV
Published On

PM Narendra Modi News

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाबाबत मोठा खुलासा केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Narendra Modi News
Eknath Shinde: आमदार अनिल बाबर यांच्या निधनावर CM शिंदेंनी व्यक्त केला शोक; शिवसैनिकासाठी लिहली भावुक पोस्ट

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, आज संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडतील. हे पर्व नारीशक्तीच्या साक्षात्काराचं पर्व आहे. निवडणुकाजवळ आल्यावर पूर्ण अर्थसंकल्प ठेवला जात नाही, आम्हीही तीच परंपरा पाळू आणि नवे सरकार आल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प घेऊन येऊ, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

नवं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल, असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देखील केला. संसदेत गोंधळ घालणं हा विरोधकांचा स्वभाव आहे. मात्र, आता त्यांना पश्चातापाची संधी आहे. संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांनी एकदा आत्मपरिक्षण करावं, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. (Latest Marathi News)

पंतप्रधान पुढे म्हणाले, "आज शेवटचा दिवस आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वांना त्यांचे मत मांडण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत त्यांनी प्रतिष्ठा राखली पाहिजे. काही लोक सवयीने गोंधळ घालतात. टीका धारदार असू शकते पण गदारोळ होता कामा नये."

"या नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी, एक सन्मानजनक निर्णय घेण्यात आला होता. नारी शक्ती वंदन कायदा पारित करण्यात आला. 26 जानेवारीलाही कर्तव्याच्या वाटेवर महिला शक्तीचे सामर्थ्य आणि शौर्य देशाने अनुभवले माझा विश्वास आहे की देश सतत प्रगतीची नवीन शिखरे पार करत पुढे जाईल, असंही मोदी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com