
देशभरातील करदात्यांसाठी आनंदाची बातमी 15 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्समध्ये मोठी सूट मिळू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार मध्यमवर्गांना सवलत देण्याबरोबरच अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे मागणीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेऊ शकतं. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो करदात्यांना विशेषत: महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या शहरी मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो.
गरीब आणि मध्यमवर्ग हा खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यानं सध्या त्रस्त आहे. त्यामुळे येत्या वर्षात मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या काय परिस्थिती आहे पाहूया.
मध्यम वर्ग मोठ्या आर्थिक तणावात
करकपात झाल्यास मध्यमवर्गाला मोठा दिलासा
उपभोग्य वस्तूंच्या मागणीला पाठबळ मिळणार
आर्थिक मंदी आणि राहणीमानाच्या वाढत्या खर्चानं मध्यमवर्ग आर्थिक दबावात
करकपातीचा सर्वाधिक लाभ नोकरदार वर्गाला होणार
नोकरदारांच्या हातात अधिक पैसा येईल
ग्राहक खर्च वाढून अंतिमतः अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यास मदत
त्यामुळे करकपात झाल्यास सर्वसामान्य नोकरदाराला मोठा दिलासा मिळेल. मात्र सध्याची कर पद्धत कशी आहे तेही पाहूया.
पगार नवीन कर प्रणाली
0-3 लाख 0%
3-7 लाख 5%
7-10 लाख 10%
10-12 लाख15%
12-15 लाख20%
15 लाख+ 30%
सध्या किती टॅक्स
पगार जुनी कर प्रणाली
0-2.5 लाख0%
2.5 - 5 लाख5%
5-10 लाख20%
10 लाख+30%
5 लाख पगार असलेल्यांना रिबेट
दरम्यान, वार्षिक 15 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला किती आयकर सवलत दिली जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.मात्र याबाबत जो निर्णय घेतला जाईल, त्याची घोषणा 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॉपकॉर्नसह इतर छोट्या वस्तूंवर जीएसटी लादणाऱ्या अर्थमंत्री सर्वसामान्य मध्यमवर्गाला दिलासा देणारा का हेच पाहायचं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.