Budget 2024: कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा! 3 औषधं होणार स्वस्त; अर्थमंत्र्यांनी काय केली घोषणा?

Cancer Medicin Will be Cheaper: कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आणखी तीन औषधांवर सीमाशुल्कात सूट देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
Budget 2024: कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा! 3 औषधं होणार स्वस्त; अर्थमंत्र्यांनी काय केली घोषणा?
Budget 2024Saam Tv
Published On

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (union finance minister nirmala sitharaman) यांनी आज संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 (Budget 2024) मध्ये कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा दिला. कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आणखी तीन औषधांवर सीमाशुल्कात सूट देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. सरकारच्या या निर्णयामुळे कॅन्सरवरील औषधं स्वस्त होणार आहे. याचा फायदा देशातील लाखो कॅन्सर रुग्णांना होण्याची शक्यता आहे.

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी सरकार कटिबद्ध असून या दिशेने सातत्याने काम करत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. कॅन्सरवरील ३ औषधांवर सीमाशुल्कात सूट दिल्याने कॅन्सरच्या उपचारावरील आर्थिक भार कमी होईल. याआधीही सरकारने कॅन्सरच्या औषधांवर सीमा शुल्कात सूट दिली होती. आता या यादीत आणखी तीन औषधांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्सर रुग्णांना दिलासा मिळाला आहे. Trastuzumab deruxtecan, Osimertinib, Durvalumab ही औषधं स्वस्त होणार आहेत.

Budget 2024: कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा! 3 औषधं होणार स्वस्त; अर्थमंत्र्यांनी काय केली घोषणा?
Education Budget 2024: खुशखबर! विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंतचं शैक्षणिक कर्ज; अर्थसंकल्पात नेमकं काय मिळालं?

देशात स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावी आणि लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सरकारच्या या पाऊलामुळे कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मागील अर्थसंकल्पातही सरकारने आरोग्य क्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. या अर्थसंकल्पात उचललेल्या पावलांमुळे देशाच्या आरोग्य क्षेत्रात आणखी सुधारणा होईल अशी आशा आहे.

Budget 2024: कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा! 3 औषधं होणार स्वस्त; अर्थमंत्र्यांनी काय केली घोषणा?
Budget 2024 Top Highlights: अर्थसंकल्पातील १० महत्वाच्या घोषणा, कोणाला काय मिळालं? वाचा एका क्लिकवर

आरोग्यमंत्र्यांनी देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी वैद्यकीय एक्स-रे मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनेल डिटेक्टरवरील मूलभूत सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मशिन्सच्या किमती कमी होण्यास मदत होईल आणि रुग्णांसाठी आरोग्यसेवा स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Budget 2024: कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा! 3 औषधं होणार स्वस्त; अर्थमंत्र्यांनी काय केली घोषणा?
Agriculture Budget 2024: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 'लाख'मोलाचं गिफ्ट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com