काही दिवसांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या या अंतरिम अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गियांना ४ मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात मोदी सरकार भारताच्या आर्थिक परिस्थितीत क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या घोषणा घेतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Latest News)
केंद्र सरकार GYAN थीमवर अर्थसंकल्प सादर करेल, असं म्हटलं जात आहे. GYAN म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता,नारी, या घटकांना केंद्रित करत मोदी सरकार हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करेल. या चार घटकांना लक्षात ठेवत मध्यमवर्गातील नागरिकांनासाठी मोदी सरकार मोठ्या घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे. मोदी सरकारच्या या अखेरच्या अर्थसंकल्पात मध्यवर्गाच्या चार अपेक्षा पूर्ण केल्या जातील, अशी आशा आहे. मध्यमवर्गाच्या कोणत्या चार अपेक्षा आहेत ते जाणून घेऊ..
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इनकम टॅक्समध्ये दिलासा
गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'नवीन कर प्रणाली' अंतर्गत करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ७.५ लाख रुपये केली होती. मात्र जुन्या करप्रणालीत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. जुन्या कर प्रणालीमध्ये, लोकांना विविध प्रकारच्या बचत आणि गृहकर्ज इत्यादींवर कर सूट मिळत होती. करमाफी हे मध्यमवर्गीयांसाठी बचतीचे एक निमित्त आहे. अशा परिस्थितीत सरकार यावेळी कर, गृहकर्ज आदींबाबत सूट देण्याची मर्यादा वाढवेल, अशी आशा मध्यवर्गियांना आहे.
रोजगार उपलब्ध व्हावा :
मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पाकडून आणखी एक अपेक्षा असते. म्हणजेच अर्थसंकल्पात जास्तीत जास्त रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे. अशी धोरणे अर्थसंकल्पात यायला हवीत जी 'मध्यम उत्पन्न गट' श्रेणीतील लोकांसाठी फायदेशीर ठरतील. आगामी काळात देश नव्या लोकसभा निवडणुकीत सहभागी होणार आहे. अशा स्थितीत सरकारने या क्षेत्रात काम करणे अपेक्षित आहे.
महागाईपासून दिलासा :
मध्यमवर्गीयांना या अर्थसंकल्पात महागाईपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अथक प्रयत्नांनंतरही, महागाई अजूनही ५ते ६ टक्क्यांच्या श्रेणीत आहे. अन्नधान्याची चलनवाढही ७ ते ९ टक्क्यांच्या दरम्यान आहे. डिसेंबरमध्ये महागाईने गेल्या चार महिन्यांतील उच्चांक गाठलाय. अशा स्थितीत मध्यमवर्गीयांना महागाईपासून दिलासा मिळावा अशी आशा आहे.
शिक्षण, आरोग्य आणि गृहनिर्माण:
मध्यमवर्गाला देशाचा ‘सामान्य माणूस’ असेही म्हणतात. या सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा आता ‘शिक्षण, आरोग्य आणि घर’अशा झाल्या आहेत. अर्थसंकल्पात परवडणाऱ्या घरांच्या योजना, शिक्षणासाठी चांगली धोरणे आणि चांगले आरोग्य कव्हरेज मिळावे, अशी मध्यमवर्गीयांची अपेक्षा आहे. सध्या देशातील उपलब्ध गृहनिर्माण यादीमध्ये परवडणाऱ्या घरांची कमतरता आहे, तर लक्झरी गृह विभाग सामान्य नागरिकांच्या बजेटच्या बाहेर जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.