आजचं बजेट नारी शक्ति, शेतकरी बांधव यांना मजबूत करण्याकरिता आहे. अनेक योजना मोदीजींनी दिल्या. जूनमध्ये जे बजेट येणार आहे, ते ऐतिहासिक असेल. आज जे संकेत दिलेत ते जगातील सर्वोत्तम भारत करण्याचे आहेत. संपूर्ण देशाने हे बजेट स्वीकारले आहे. मला अभिमान आहे निर्मला सितारामण यांनी हे बजेट सादर केले. ६५ वर्षे ज्यांनी काही केले नाही, त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
#WATCH | Former CEO NITI Aayog Amitabh Kant says, "The budget is very reflective of inclusive growth. It is reflective of the confidence of the government that will come into the long-term budget. It believes in micro-economic fundamentals. It believes in bringing financial… pic.twitter.com/3XGNY4fsGe
— ANI (@ANI) February 1, 2024
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोटी-कपडा-मकान देणारे हे मोदी सरकार आणि आजचा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत शिंदेंनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. कोणतीही दरवाढ,करवाढ न करता पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून, विकसित भारत या ध्येयाकडे वाटचाल करणारा आहे, असेही शिंदे म्हणाले.
नागपूर
देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. निवडणुकीपूर्वी सादर होणारे हे बजेट आहे, यामुळे विरोधकांनी केवळ टीका करू नये तर अर्थसंकल्पाचा अभ्यासही करावा, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.
अर्थसंकल्पात फक्त आर्थिक तरतूद करून चालत नाही; तर त्याचं आर्थिक नियोजन करायला लागतं. तेच मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत केले आहे. जे टीका करतात, त्यांनी इतकी वर्षे विकास का केला नाही? मोदी सरकारच्या काळात देश अकराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहचू शकला हेच मोदी सरकारचे यश आहे. त्यामुळेच आजचा जो अर्थसंकल्प आहे, तो समाधानकारक आहे, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रांचा समावेश होता. आज आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपला देश जगात एक आत्मविश्वासपूर्ण देश बनला आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली.
बुलडाणा
हा अर्थसंकल्प केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सादर केलाय. शेतकऱ्यांच्या हातात काही येईल असं वाटत नाही, असं स्पष्ट मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले. तसेच मागील दहा वर्षांतील अर्थसंकल्पाचे ऑडिट करायला हवे; जेणेकरून मागील अर्थसंकल्पात घोषणा केल्या, त्यांची किती अंमलबजावणी झाली हे कळेल, असेही ते म्हणाले.
संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावर टीकास्त्र सोडलं. हा अर्थसंकल्प मोदी सरकारचा शेवटचा असेल, असं ते म्हणाले. अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. आम्हाला असल्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही, असं ते म्हणाले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषण संपलं. जवळपास एका तासाचं हे भाषण होतं. सरकारच्या या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. मात्र, या अर्थसंकल्पात गरीब, महिला वर्ग, शेतकरी, तरूण आदी घटकांवर अधिक भर दिल्याचं दिसून आलं.
करदात्यांना कोणताही दिलासा नाही
कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही
No changes in Income Tax rates, Union Finance Minister Nirmala Sitharaman presents Interim Budget 2024-25. pic.twitter.com/H90QxEmaCt
— ANI (@ANI) February 1, 2024
PM kisan Yojana चा 38 लाख शेतकऱ्यांना फायदा
आयुषमान भारत योजना सर्व आशासेविकांना लागू
पुढची पाच वर्षे विकासाची असतील
नवीन मेडिकल कॉलेज उभारणार
९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झालाय
१ कोटी महिलांना लखपती दीदी केलं
लखपती दीदी योजनेतून आत्मनिर्भर केलं
आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना आयुषमान भारत योजना लागू
धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणार
पर्यटन क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन
राज्यांना व्याजमुक्त कर्ज देणार
७५ हजार कोटींचे व्याजमुक्त कर्ज
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणार
ITR फाइल करण्याची सुविधा अत्यंत सोपी आणि सुलभ झाली
कर संकलनात तिपटीने वाढ झाली.
#WATCH | Interim Budget 2024-25 | Union Finance Minister Nirmala Sitharaman says, "...The revised estimate of the fiscal deficit is 5.8% of GDP, improving on the budget estimate notwithstanding moderation in the nominal growth estimates." pic.twitter.com/MxehZWCPZA
— ANI (@ANI) February 1, 2024
निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात झाली. भाषणाच्या सुरुवातीलाच विकासाचा मंत्र त्यांनी सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास वेगाने झाला आहे. गेल्या १० वर्षात सकारात्मक विकास झाला, असं त्या म्हणाल्या.
गरिबांचं कल्याण, गरजा आणि आशा- आकांक्षा यांना आमचं प्राधान्य
२५ कोटी लोकांसाठी विविध योजना राबवल्या.
जनधन खात्यांमुळे ४.७ लाख कोटींची बचत झाली.
सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचत आहेत.
सबका साथ, सबका विकास यावर सरकार भर देत आहे.
ग्रामीण विकासाच्या योजना वेगाने लागू होत आहेत.
घर, पाणी, वीज दिली जात आहे.
८० कोटी जनतेला मोफत रेशन
सर्वसमावेशक विकासावर सरकारचा भर
२०४७ पर्यंत आपला देश विकसित राष्ट्र असेल.
आम्ही तीन तलाकसंबंधी कठोर कायदा आणला
१० वर्षांत महिला सक्षमीकरणावर सरकारचा भर
तरुणांना सशक्त बनवण्याचे प्रयत्न
३ हजार नव्या आयटीआय सुरू केल्या
५४ लाख तरुणांना प्रशिक्षित केलं
युवा क्षमता विकासासाठी सरकार कटिबद्ध
संसदेत आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच मिशन लोकसभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून नाशिकच्या दौऱ्यावर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज घेणार नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांच मार्गदर्शन शिबिर
नाशिकच्या दौऱ्यात राज यांच्या उपस्थितीत मनसेत अनेकांचे प्रवेश सोहळे
लोकसभा निवडणुकीत लढवण्यास इच्छुक असलेल्या अन्य पक्षातील काही दमदार नेत्यांचेही प्रवेश होणार असल्याची चर्चा
राज यांच्या उपस्थितीत नेमकं कोण मनसेत प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष
तर २ फेब्रुवारीला राज ठाकरे घेणार पत्रकार परिषद
बजेट 2024 चे काउंडाऊन सुरू झालं असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनात पोहचल्या आहेत. राष्ट्रपतींची भेट घेऊन त्या थेट संसदेत जाणार असून बजेटला सुरुवात करणार आहे. या बजेटमध्ये नेमक्या कोणत्या घोषणा होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.
वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद संकुलात पूजेला सुरुवात झाली आहे. तब्बल ३१ देवीची आरती होत आहे. यासाठी गुरुवारी सकाळपासूनच भाविकांनी परिसरात गर्दी केपी आहे. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने बुधवारी हिंदूंना ज्ञानवापी मशीदीच्या आवारात असलेल्या तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदूंना मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये केमिकल वाहून नेणाऱ्या गॅस टँकरचा अपघात झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायुगळती सुरू झाली. सद्यस्थितीला नऊ ते दहा अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल असून जवानांकडून गॅस गळती रोखण्याचा प्रमाण कमी करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पाचव्यांदा ईडीने समन्स बजावलं आहे. उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी हजर राहावे, असं ईडीने केजरीवाल यांना सांगितलं आहे. याआधी ईडीने २ नोव्हेंबर, २१ डिसेंबर, ३ आणि १७ जानेवारी रोजी केजरीवाल यांना समन्स बजावले होते.
देशासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांचा सहावा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारे काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.