Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर, मोडणार रेकॉर्ड

Budget 2024 Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanGoogle
Published On

Nirmala Sitharaman Presents Budget 2024

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारीला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याऱ्या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची त्या बरोबरी करणार आहे. निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. त्यांनी जुलै 2019 पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्या पुढील आठवड्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. (latest budget update)

'या' नेत्यांना मागे सोडणार

निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करून मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांसारख्या माजी अर्थमंत्र्यांच्या रेकॉर्डला मागे टाकतील. या नेत्यांनी सलग पाच अर्थसंकल्प सादर केले होते. अर्थमंत्री म्हणून, देसाई यांनी 1959-1964 दरम्यान पाच वार्षिक आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अर्थसंकल्पात मोठी घोषणा नाही

सार्वत्रिक निवडणुका होणार आहे, त्यामुळं सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्पात (Budget 2024) कोणतेही मोठे धोरणात्मक बदल होण्याची शक्यता नाही. अर्थमंत्र्यांनी गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात अंतरिम अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा करण्यास नकार दिला होता. सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी हे केवळ व्होट ऑन अकाउंट असेल, असं त्या म्हणाल्या होत्या.

नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता

सार्वत्रिक निवडणुकीनंतर जूनच्या आसपास नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नवीन सरकार 2024-25 साठीचा संपूर्ण अर्थसंकल्प जुलैमध्ये आणणार आहे. साधारणपणे, अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या धोरणात्मक घोषणा नसतात, परंतु अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली पावले उचलण्यास सरकारवर कोणताही प्रतिबंध नाही.

Nirmala Sitharaman
Budget 2024: निर्मला सीतारामन मोडणार मोरारजी देसाईंचा विक्रम? असा विक्रम करणाऱ्या पहिल्याच महिला अर्थमंत्री

2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर, अरुण जेटली यांनी अर्थ मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी 2014-15 ते 2018-19 पर्यंत सलग पाच अर्थसंकल्प सादर केले. 2017 मध्ये, सरकारने फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसाऐवजी एका तारखेला अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला. यामुळे 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करण्याची परंपरा संपुष्टात आली.

इंदिरा गांधींनंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मोदी सरकारने सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये वित्त विभागाची जबाबदारी सोपवली. इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या. इंदिरा गांधी यांनी 1970-71 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी बजेट दस्तऐवजांसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक ब्रीफकेस काढून टाकल्या आणि पहिलं डिजीटल बजेट सादर केलं होतं.

Nirmala Sitharaman
Budget 2024: अर्थसंकल्पानंतर शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार? 'ही' मोठी घोषणा होण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com