Budget 2024: अर्थसंकल्पातील घोषणेमुळे 'या' क्षेत्रात २.५ लाख नोकऱ्या मिळणार, सरकारचा मेगा प्लान

EV Sector Job Increases: देशाचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहे. अर्थसंकल्पता ईलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Job
JobSaam Tv
Published On

Budget 2024 Impact On Electric Vehicle Industry Increases Job Opportunity :

देशाचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहे. अर्थसंकल्पता ईलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. येत्या काही वर्षात ईलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे.

सार्वजनिक वाहतूकीसाठी ई-बसना प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे देशात ईलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढेल त्याचसोबत ईलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात नोकरीची संधी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत कंपन्यानी माहिती दिली आहे. बजेटमध्ये ईव्ही क्षेत्राबाबत केलेल्या घोषणांमुळे नोकऱ्यांच्या संधीत वाढ होईल. त्यानुसार, पुढील पाच वर्षात २.५ लाखांहून जास्त नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. (Latest News)

याबाबत टीमलीज सर्व्हिसेसचे सीईओ कार्तिक नारायण यांनी माहिती दिली आहे. पुढील ४ -५ वर्षात २.५ लाख नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. भारतात तब्बल ७ हजार चार्जिंग स्टेशन येतात. पुढील ५ वर्षात ५० हजार चार्जिंग स्टेशनची आवश्यकता आहे. त्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यामध्ये साइट इंजिनियर, एक्सपर्ट, सर्व्हिस टेक्निशीयन आणि अनेक लोकांचा समावेश असेल, असे ते म्हणाले. (latest News)

याबाबत राप्ती एनर्जीने सह-संस्थापक आणि सीईओ दिनेश अर्जुन यांनी माहिती दिली. देशभरात सार्वजनिक चार्जर्सच्या उपलब्धतेत खूप वाढ होईल. ईव्ही कंपन्याना बाजारपेठेत हाय मार्केट अॅक्सेप्टेंस मिळेल तसेच गुंतवणूकदारांना या इंडस्ट्रीत गुंतवणूक करायला आवडेल. या घोषणेमुळे देशात ईव्ही खरेदी करण्यासाठी अनेक लोक तयार होती. हे उद्योजकांना बॅरी मॅनेजमेंट सेगमेंट आणि टेक्नॉलॉजीमध्ये नवीन बदल करण्यास प्रोत्साहित करेल. त्यामुळे या इंडस्ट्रीला नवीन चालना मिळेल.

Job
Budget 2024: निर्मला सीतारामन यांचं आतापर्यंतचं रेकॉर्डब्रेक अर्थसंकल्पीय भाषण, फक्त 'इतके' मिनीटं बोलल्या

देशात सध्या ईलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ पाहायला मिळत आहे. ग्राहक ईलेक्ट्रिक वाहनांना सर्वात जास्त पसंती दर्शवली आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीचा विस्तार करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे या इंडस्ट्रीत नोकऱ्यांची संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Job
Gold Silver Rate (2nd February 2024): सोन्याचा भाव सुसाट! चांदीतही उसळी, मुंबई-पुण्यातील आजचा दर किती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com