Breaking News Live Updates : गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज आक्रमक

Maharashtra Breaking News Live Updates: आज ९ डिसेंबर २०२३, देश विदेशासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडी वाचा एका क्लिकवर...
breaking marathi news Maharashtra politics latest Updates Marathi batmya on maratha reservation Onion farmers stage protest
breaking marathi news Maharashtra politics latest Updates Marathi batmya on maratha reservation Onion farmers stage protest Saam TV
Published On

गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज आक्रमक

गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज आक्रमक झाला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. चप्पलफेक करणं म्हणजे वादाचा प्रकार आहे. दोन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाचे नेते शशिकांत तरंगे यांनी दिला आहे.

Sharad Pawar News : कांदा निर्यातीबंदी विरोधात शरद पवार उतरणार रस्त्यावर

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात सोमवारी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा रास्तारोको

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड चौफुलीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

केंद्राच्या निर्यातबंदीच्या निर्णयाचा निषेध करणार

बसपा खासदार दानिश अली यांची पक्षातून हकालपट्टी

बसपा प्रमुख मायावती यांनी खासदार दानिश अली यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे.पक्षाच्या विरोधात कृत्य केल्याने खासदार अली यांना निलंबित करण्यात आलं आहे. दानीश अली अमरोहा इथून खासदार आहेत. भाजप खासदार रमेश बिदूरी यांनी दानीश अली यांना संसदेत अपशब्द वापरल्यानंतर चर्चेत आले होते. राहुल गांधी यांनी भेट घेऊन काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत उभा असल्याचं त्यावेळी सांगितलं होतं.

अमित ठाकरे 'अॅक्शन मोड'वर; काम न करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना कडक इशारा

Pune News : मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज, शनिवारी पुण्यात घेतली विभाग अध्यक्षांची बैठक पुणे लोकसभा प्रभारी म्हणून अमित ठाकरेंनी लक्ष केले केंद्रीत जे पदाधिकारी काम करत नाहीत, त्यांची पदे बदला, असा इशारा ठाकरेंनी दिला अमित ठाकरेंनी केल्या विभाग अध्यक्षांना सूचना लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. त्यासाठी पक्ष संघटना मजबूत असणे आवश्यक आहे, असे ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंची पुढील आठवड्यात पुणे लोकसभा आढावा बैठक होणार पुण्यात मनसेचा मेळावा होणार असून, त्यासाठी मनसेची तयारी सुरू

Breaking News Live Updates: कोल्हापुरात पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

कोल्हापूरमध्ये पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात होत नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. आक्रमक महिलांनी घागरी घेऊन रस्ता अडवला आहे. शहरातील माऊली चौक येथे महिलांनी रास्ता रोको केला आहे. या रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा निर्माण झाल्या आहेत.

Breaking News Live Updates: खासदार नवनीत राणा अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार? चर्चांना उधाण

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना नवनीत राणा यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नवनीत राणा आगामी लोकसभेची निवडणूक अजित पवार गटाकडून लढणार का? असा चर्चा सुरू झाल्या आहेत.

मला फक्त भाषण करायला आवडत नाही - अजित पवार

महायुती सरकारमध्ये मी सहभागी झालो आहे. विचार जरी वेगळे असले तरी विकास झाला पाहिजे. सर्व समाजांतील नागरिकांना सरकार आपले वाटले पाहिजे. कामांचा दर्जा चांगला असला पाहिजे. मला समस्या सोडवण्याची आवड आहे. फक्त भाषण करायला मला आवडत नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

कांदा निर्यातबंदीविरोधात स्वाभिमानीचा रास्ता रोको

मनमाड, नाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले. सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले. काल ठिकठिकाणी आंदोलने झाल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजी नगर-नाशिक महामार्गावर विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. गारपीटीच्या तडाख्यातून शेतकरी सावरत असताना आणि कांद्याला चांगला दर मिळत असताना, अचानक केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. सरकारने निर्यातबंदी मागे घेतली नाही तर, जिल्ह्यातून एकही कांदा बाहेर जाऊ दिला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला.

राज्य मागासवर्ग आयोगाचे आणखी २ सदस्य राजीनामा देणार?

राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचे राजीनामासत्र सुरूच आहे. आता आणखी दोन सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. येत्या एक ते दोन दिवसांत ते राजीनामे देतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Breaking News Live Updates: पाण्याच्या मागणीसाठी सिन्नरमधील शेतकरी आक्रमक; थेट समृद्धी महामार्ग रोखला

निळवंडे धरणातून सोडलेले पाणी सिन्नर तालुक्यातील गावांना न देता नगर जिल्ह्यात वळविल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सायाळे गावाजवळ शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रोखत आंदोलन सुरू केलं आहे. अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे वाहनचालकामध्ये गोंधळ उडाला आहे.

जल प्रदूषणामुळे लोणार सरोवरातील जैवविविधतेला निर्माण झाला धोका

वाढत्या जल प्रदूषणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील जैवविविधतेला धोका निर्माण झालाय. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास रामसर स्थळाचा मिळालेला दर्जाही धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

दुसरीकडे सरोवरातील पाण्याचाही पीएच कमी झाल्यामुळे सरोवरातील नैसर्गिक परिसंस्था, अधिवास आणि विशिष्ट स्थानिक प्रजातीलाही यामुळे फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत पाच सदस्यीय पथकाने नुकतेच येथील पाण्याचे, मातीचे व गाळाचे नमुने गोळा केले, त्यावेळी प्राथमिक पाहणीच्या निष्कर्षातून उपरोक्त भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Breaking News Live Updates:शेतकऱ्यांना अग्रीम विमा देण्यासाठी १९ डिसेंबरची डेडलाईन

धाराशिव जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांना अग्रीम विम्याचे वाटप करण्याचे अद्यापही बाकी असून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक घेतली. याबैठकीत उर्वरित शेतकऱ्यांना १९ डिसेंबरपर्यंत अग्रीम वितरीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

चालू वर्षाच्या खरीपातील अग्रीम भरपाई वाटपाच्या शेतकरी संख्येत मोठी तफावत असल्याची तक्रार विमा याचिकाकर्ते अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना १९ डिसेंबर पर्यंत अग्रीम वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

Breaking News Live Updates: राज्यात ४४ ठिकाणी NIA कडून छापेमारी, आतापर्यंत १५ संशयित ताब्यात

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाची पहाटेपासून छापेमारी सुरू आहे. या कारवाईत ईसीस दहशतवादी संघटनेशी संबधित तब्बल 15 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरीवली शहापूर, मिरा रोड, भिवंडी , कल्याण या ठिकाणी एनआयए आणि एटीएसची पहाटेपासून छापेमारी सुरु आहे.

हसीब मुल्ला , मुसाफ मुल्ला , रेहन सुसे, फरहान सुसे, फिरोज कुवारी ,आदिल खोत, मुखलीस नाचन , सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफील नाचन, राजील नाचन, शदुब दिवकर, कासिम बेलोरे, मुंजीर के पी, अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्य साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करण्यात आले आहे. 18 जुलैला पुण्यातील कोथरूड परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री इमरान खान आणि मोहम्मद साकी या दोन दहशतवाद्यांना पकडलं होतं .

तर त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर झालेल्या पोलीस तपासात दहशतवाद्यांची पुढची लिंक उघडकीस आली आहे.

Maharashtra Breaking News Live: कांद्याचे भाव पुन्हा वाढणार? अनेक ठिकाणी लिलाव बंद

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने होत असून अनेक बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा राज्याचा दौरा सुरू आहे.

आरक्षण देण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. त्याचबरोबर मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी गठीत केलेल्या शिंदे समितीचे अध्यक्ष आज पुण्यात येणार आहे. निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे आज पुणे जिल्ह्याचा घेणार आढावा घेणार आहेत. यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडींचाही आढावा आपण या लाईव्ह ब्लॉमधून घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com