Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईई काय हा प्रकार! लॅपटॉपवर बनवल्या पुऱ्या, महिलेचा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Viral Video: महिलेने लॅपटॉप वापरून पुरी लाटली आणि व्हायरल झाली. हा अनोखा देसी जुगाड पाहून नेटकरी थक्क झाले. सोशल मीडियावर सध्या हा मजेशीर व्हिडीओ प्रचंड गाजतोय.

Manasvi Choudhary

येत्या काही दिवसांतच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पााला गोड पदार्थाचे नैवेद्य दाखवले जाते. घरात पाहुणी मंडळी जमतात. अश्यातच सर्व पाहुण्यासाठी श्रीखंड पुरीचा बेत महिला खास करतात. मात्र एक एक पुरी लाटून ती तळायची म्हटलं की सर्वच महिला वैतागतात. अनेकदा पुऱ्या बनवण्याचा महिलांना कंटाळा येतो. अशातच सोशल मीडियावर एका महिलेचा पुरी बनवताचा देसी जुगाड व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

इन्स्टाग्रामवर @desi. crap या सोशल मीडियावर अकाउंटवर ही व्हिडीओ शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पुरी करताना दिसत आहे. या महिलेने अनोखी शक्कल लढवली आहे. लॅपटॉपच्या मध्यस्थानी पिठाचा गोळे ठेऊन नंतर लॅपटॉप बंद करत ती पुऱ्या बनवताना दिसतेय. अशाप्रकारे पुरी तयार झाली की गॅसवर गरम तेलामध्ये तळून घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतोय आहे.

सोशल मीडियावर जुगाडचे विविध व्हिडीओ व्हायरल होतात. महिलांचा देखील यामध्ये सहभाग असतो. स्वयंपाकघरात महिला नेहमीच काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. आता देखील महिलेने जे केलं आहे ते पाहून तुम्हीही विचारात पडल्याशिवाय राहणार नाही. महिलेच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

Bhiwandi Accident: तोल गेला अन् आयुष्याचा दोर कापला; ट्रकखाली चिरडून डॉक्टरचा मृत्यू| VIDEO

Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात १२,००० स्पेशल ट्रेन चालवणार

Lalit Prabhakar: प्रियसीच्या आठवणीत ललित प्रभाकर घालणार 'गोंधळ'; 'आरपार'मधील 'जागरण गोंधळ' गाणं प्रदर्शित

प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई - कोकण वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल; मध्य रेल्वेचा निर्णय

SCROLL FOR NEXT