Bhiwandi Accident: तोल गेला अन् आयुष्याचा दोर कापला; ट्रकखाली चिरडून डॉक्टरचा मृत्यू| VIDEO

Doctor Crushed By Truck After Losing Balance: भिवंडीतील सिराज हॉस्पिटलजवळ खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात डॉक्टर नसीम अन्सारी यांचा मृत्यू झाला. ट्रकखाली चिरडून झालेल्या या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्ता रोखला.

भिवंडी‌ शहरातील वंजारपट्टी नाका येथील सिराज हॉस्पिटलजवळ रात्री एक वेदनादायक अपघात झाला. डॉक्टर नसीम अन्सारी त्यांच्या अ‍ॅक्टिव्हा बाईकवरून घरी परतत होते. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांच्या बाईकचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. त्याच वेळी तेथून जाणाऱ्या एका ट्रकच्या मागील टायरने त्यांना चिरडले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालायं. संतप्त नागरिकांनी रस्ता रोखून गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना समजावून जमाव हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com