Manasvi Choudhary
Google Gemini Ai फोटो सध्या ट्रेंडमध्ये आहे.मागील अनेक दिवसांपासून इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर हा ट्रेंड पाहायला मिळत आहे. मुली किंवा महिला साडीमधील फोटोंचा रेट्रो लूक क्रिएट करत आहेत. तर अनेकजण 3D मॉडेल्सच्या सहाय्याने फोटो क्रिएट करत आहेत. हे फोटो खरे नाही नसून ते Nano Banana हे टूल्स वापरून क्रिएट करतात. सध्या एक नवीन ट्रेंड चर्चेत आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या लहानपणीच्या फोटोला मिठ्ठी मारताना अनुभव घेऊ शकणार आहात.
इंस्टाग्रामवर सध्या एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. ज्याचे नाव 'Hug My Younger Self' असं आहे. यामध्ये आपण आपल्या लहानपणीच्या फोटोला मिठी मारताना दिसत आहे. या आठवणीत रमताना दिसणार आहेत. हा ट्रेंड सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हा ट्रेंड फॉलो केला असून त्याचे व्हिडीओ, फोटो पोस्ट केले आहेत. Gemini Nano चा वापर करून तुम्हीदेखील 'Hug My Younger Self'हा ट्रेंड फॉलो करू शकता.
Google Gemini वापरून 'Hug My Younger Self' फोटो कसा क्रिएट करायचा?
सर्वप्रथम Google Gemini हे सुरू करा.
यानंतर एका स्पष्ट दिसेल असा फोटो अपलोड करा.
यानंतर तुम्ही फोटोला कमांड द्या यासाठी तुम्हाला Prompt द्यावा लागणार आहे.
यानंतर अपडेट आयकॉनवर क्लिक करा तुमचा फोटो काही सेकंदातच क्रिएट झाला असेल.
Prompt-
Using my present photo and my childhood photo, create a realistic and heartwarming image where my current self is hugging my younger self. Make sure both faces and features are preserved accurately so the resemblance is clear. The mood should express self-love, nostalgia, and warmth, with natural lighting and a soft, emotional atmosphere—capturing the bond between who I was and who I am now.”
generate a cute polaroid picture of my older self hugging my younger self.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.