सध्या वाण सामानांपासून सगळ्याच प्रकारचे बिल भरण्यासाठी UPI चा वापर लोक करतात.
तुम्ही सुद्धा Paytm, Phone आणि Google Pay वापरत असाल तर ही महत्वाची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे.
नवीन धोरणानुसार, UPI App पीक अवर्समध्ये बॅलन्स चेक एपीआय कॉल थांबवावे लागतील.
तुम्ही या काळात, वापरकर्त्यांच्या वतीने प्रत्येक व्यवहारानंतर बॅंकेला स्वयंचलित बॅलन्स अपडेट्स पाठवावे लागतील.
ऑटोपे आदेश आता फक्त गर्दी नसलेल्या वेळेतच लागू होतील. जसे की OTT सबक्रिप्शन, sip हे आता नॉन-पॅक वेळेत होतील. म्हणजेच सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ ते संध्याकाळी ५ ते ९.२० नंतर.
जेव्हा एखादा UPI व्यवहार होत नाही तेव्हा व्यवराची स्थिती वारंवार स्थिती आपण तपासतो. मात्र नवीन नियमांनुसार व्यवहार झाल्यावर किमान ९० सेकंद उलटल्यानंतर स्थिती पाहता येणार आहे.
तुम्हाला केलेला पेमेंटची स्थिती पाहण्यासाठी ९० सेकंदाची वाट पाहावी लागणार आहे. तसेच फक्त तीन वेळा स्थिती तपासता येणार आहे.
तुम्हाला यासंबंधीत आणखी गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कस्टमर केअरशी संपर्क साधावा.