ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हळदीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात भेट देण्यासाठी अनेक ऐतिहासिक,धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेली ठिकाणं आहेत.
महाराष्ट्रात सांगलीजवळ एक असं स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन आहे जे पर्यटकांना खूपच आकर्षित करते.
या सुंदर हिल स्टेशनचे नाव दंडोबा हिल्स हिल स्टेशन आहे.
पावसाळ्यात येथे तुम्हाला नैसर्गिक सुंदरतेचा आनंद घ्यायला मिळेल. येथील तुमचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरेल.
दंडोबा हिल्स वन अभयारण्य एक लोकप्रिय ठिकाण आहे. तुम्ही येथे अॅडव्हेंचर स्पोर्ट आणि ट्रेकिंगचा देखील आनंद घेऊ शकता.
महाराष्ट्रातील सांगली शहरापासून दंडोबा हिल्सचे अंतर सुमारे 34 किलोमीटर आहे.
१७७ मीटर उंचीवरुन कोसळणाऱ्या धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासारखे आहे. येथे नक्की जा.