ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जिथे प्रेम असते तिथे राग येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. काही नाती चुकीच्या शब्दांमुळेही संपतात.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रागाच्या भरातही तुमच्या जोडीदाराला कोणत्या गोष्टी बोलू नयेत.
रागाच्या भरात कधीही तुमच्या जोडीदाराची तुलना करु नका. त्यांना कमी लेखण्याचा अजिबात प्रयत्न करु नका.
भांडण किंवा रागाच्या वेळी कधीही भूतकाळाचा उल्लेख करु नये, यामुळे नातेसंबंध बिघडतात.
जोडीदाराला रागाच्या भरात कधीच बोलू नका की मी नेहमीच तुमच्यासाठी खूप काही करतो.
रागाच्या भरात तुमच्या जोडीदाराला कधीही बोलू नका की तुम्ही नेहमीच असे करता, तुम्ही नेहमीच चुकीचे असता.
इतर मुलींची अजिबात प्रशंसा करु नका, अन्यथा तुमचे नाते बिघडू शकते.