ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मूग डाळ, रवा, आले, हिरवी मिरची, लिंबाचा रस, दही, इनो, मीठ, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, किसलेले गाजर, शिमला मिरची, हळद आणि लाल मिरची
प्रथम मूग डाळ पाण्यात सुमारे 5 तास भिजत ठेवा.
नंतर ही डाळ, हिरव्या मिरच्या आणि आल्यासोबत मिक्सरमध्ये बारीक करा आणि जाडसर पीठ तयार करा.
आता एका पॅनमध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, किसलेले गाजर, शिमला मिरची, हळद आणि लाल मिरची पावडर घाला आणि ते पिठात मिसळा.
आता या बॅटरमध्ये रवा, दही आणि लिंबाचा रस मिसळा आणि यात इनो घालून ते आंबवण्यासाठी बाजूला ठेवा.
नंतर हे पीठ इडलीच्या साच्यात ओता आणि वाफवून घ्या .
गरमागरम मसाला इडली तयार आहे, नारळाच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसह सर्व्ह करा.