ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण घरापेक्षा जास्त वेळ ऑपिसमध्ये घालवतो. अनेकदा कामाच्या ठिकाणी चांगले मित्र बनतात. अशावेळी आपण त्यांच्या सोबत सर्वकाही शेअर करतो.
अनेकदा आपण आपल्या ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत पसर्नल तसेच प्रोफेशनल माहिती शेअर करतो, जे करु नये.
काही अशा गोष्टी असतात ज्या मैत्रीमध्ये देखील ऑफिस सहकाऱ्यांना सांगू नये, जाणून घ्या.
तुमच्या सहकाऱ्यांसोबत कधीही पगाराची माहिती चर्चा करु नका किंवा शेअर करु नका.
तुमच्या जुन्या नोकरीत काय घडले, तुम्हाला का काढू टाकण्यात आले किंवा तुम्ही का निघून गेलात या गोष्टी अजिबात शेअर करु नका.
ऑफिसमध्ये कोणासोबतही तुमच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा करु नका.
तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती, इनकम किंवा रिलेशनशिपबद्दल कोणालाही सांगू नका.