Viral peas shelling hack zero effort saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शून्य मेहनत! आता मटार सोलायला अर्धा तास लागणार नाही, सोशल मिडीयावर व्हायरल झाला हॅक

Viral peas shelling hack zero effort: स्वयंपाकघरातील कामे सोपी करण्यासाठी अनेक हॅक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या वाटाणे सोलण्याचा एक भन्नाट हॅक चर्चेत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियाचा वापर आता वाढलाय. सोशल मिडीयाच्या वापराने आजकाल अनेक गोष्टी वायरल होत असतात. या सोशल मिडीयावर एखादी गोष्ट पोस्ट केली तर की कधीही व्हायरल होऊ शकते. असाच सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ गृहिणींच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.

सध्या सोशल मिडीयावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये कोणतीही मेहनत न घेता मटार सोलण्याची ट्रीक दाखवली आहे. मटार सोलणं हे गृहिणींसमोर असलेलं एक मोठं टास्क मानलं जातं. मात्र या व्हायरल व्हिडीओमुळे लोकांचं हे काम सोपं होणार आहे.

मटार सोलण्याचा व्हिडीओ व्हायरल

आतापर्यंत आपल्या प्रत्येकाने कधी ना कधी मटार सोलले असतील. पाव किलो मटार सोलायला देखील बराच वेळ लागतो. अशातच आता एक भन्नाट ट्रिक व्हायरल झालीये. यामध्ये एका भांड्यामध्ये पाणी भरून त्यात मटार टाकले आहेत. असं केल्यानंतर गॅसवर ठेऊन हे भांडं मटारसकट गरम केलं.

जेव्हा पाणी गरम होतं झालं तेव्हा हे भांडं गॅसवरून उतरवून खाली ठेवण्यात आलं. यावेळी त्यामध्ये सालासकट असलेले मटार हलके दाबल्यास त्यातून दाणे बाहेर पडत होते. यानंतर पाणी आणि दाणे वेगळे करू शकता.

vrajput40 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आलीये. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, आळशी लोकांसाठी एकदम परफेक्ट ट्रिक आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला असून त्यांनी लाईक केलाय. शिवाय बऱ्याच जणांनी या व्हिडीओला शेअर देखील केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam TV Exit Poll : भिवंडीत कुणाची सत्ता? ६ बिनविरोध जागा येऊनही भाजपचं काय? पाहा महाएक्झिट पोलचा अंदाज

Daily Use Hairstyle: कॉलेज ऑफिससाठी करा या ७ ट्रेंडी क्लासी हेअरस्टाईल, तुमचा लूक दिसेल अट्रॅक्टिव्ह

Saam TV Exit Poll: उपनगरात शिंदेंचं वर्चस्व; ठाकरे गटाचा सुपडासाफ, एक्झिट पोलमध्ये धक्कादायक निकाल

Saam TV exit poll : पिंपरीत पवारांना धक्का, भाजपची सत्ता, वाचा एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा

Sabudana Chivda Recipe : घरीच बनवा साबुदाणा चिवडा; ३-४ महिने चांगला टिकेल, ऑफिस स्नॅक्ससाठी हेल्दी ऑप्शन

SCROLL FOR NEXT