व्हायरल न्यूज

Train Viral Video: ट्रेन येत असल्याचे पाहून तरुणानं केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य, व्हिडिओ व्हायरल

Priya More

West Bengal: सध्याच्या काळामध्ये तरुण पिढी नैराश्येत येऊन आयुष्य संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसते. आयुष्य हे अनमोल आहे असे असताना देखील ही तरुण पिढी छोट्या कारणांवरुन जीवन संपवण्याचा निर्णय घेतात. देशामध्ये तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. आत्महत्येसारखे भयंकर पाऊल उचलण्यापूर्वी हे तरुण काहीच विचार करत नाहीत. अशामध्ये सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणाचा आत्महत्येच्या प्रयत्नाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. काळजाचा थरकाप उडवणारा या व्हिडिओने नेटिझन्सला विचार करायला लावले आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक रेल्वे स्टेशन दिसत आहे. एक तरुण प्लॅटफॉर्मवर एकटा उभा राहिलेला दिसत आहे. यानंतर तो इकडे तिकडे पाहून आपल्या आजूबाजूला कोणी आहे का हे पाहतो. समोरुन ट्रेन येण्याची तो वाट पाहतो. ट्रेन येण्याची वेळ होताच हा तरुण रुळावर उडी मारतो. त्यानंतर रुळावर डोकं ठेवून तो झोपतो.

सुदैवाने दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका लेडी कॉन्स्टेबलची नजर त्याच्यावर पडते. त्यानंतर ही लेडी कॉन्स्टेबल जीवाची पर्वा न करता रुळावर उडी मारली आणि ट्रेन येण्यापूर्वीच या तरुणाला बाजूला ओढते. हे पाहून दोन व्यक्ती या कॉन्स्टेबलच्या मदतीला येतात. त्यानंतर हे तिघे मिळून या तरुणाला प्लॅटफॉर्मवर आणतात. लेडी कॉन्स्टेबलच्या प्रसांगवधानामुळे या तरुणाचा जीव वाचतो.

या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ आरपीएफ इंडियाने ट्विटरवर शेअर केला आहे. सुमती असे या लेडी कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर रेल्वे स्थानकावर घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्स हे लेडी कॉन्स्टेबलच्या कामगिरीचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'मॅमला सलाम आहे. त्याच्या सतर्कतेमुळे कोणाचा तरी जीव वाचला.' आणखी एका युजरने लिहिले की, 'हे अतिशय कौतुकास्पद पाऊल आहे. पोलीस हवालदार म्हणून तू खरी देवी आहेस.' तर तिसऱ्या युजरने कमेंट करत असे लिहिले की, 'दीदी, तुमचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT