Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: सकाळी कामावर निघालेला युवक परतलाच नाही; बाईक चालवत असताना आला हार्ट अटॅक; जागीच मृत्यू

Heart Attack Cctv Footage: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. परंतु, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण भावूक झालेला आहे, असे काय घडले ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Uttar Pradesh News: बाइक चालवतच असताना एका युवकाचा अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशतील मुरादाबाद येथे घडली असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे शिवाय सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाला मृत्यू

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक तरुण बुलेटवरुन रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. अचानक तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन बुलेटसह कोसळला जातो. सुरुवातीस रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाचा तोल गेला असे वाटते. मात्र, त्यानंतर तरुणाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर देत नसल्याने अन्य लोक तरुणाला उचलण्यासाठी जातात. परंतू तो पर्यंत खूप उशीर झालेला आहे. कारण, तरुणाचा जागीच हृदयविकाराच्या(heart attack) झटक्याने मृत्यू झालेला असतो.

ही संपूर्ण घटना परिसरात जवळच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आणि त्यानंतर हा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ सोशल माध्यमांवरही व्हायरल झाला. सध्या तो एक्सवरील @NavbharatTimes यावर अपलोड करण्यात आलेला आहे.

व्हिडीओवर प्रतिक्रिया, सोशल मीडियावर हळहळ

व्हिडिओला(Video) पाहून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत आहे. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''सध्या याचे प्रमाण वाढत चालले आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंटमध्ये लिहिले,''आरोग्याची काळजी प्रत्येकान घ्यावी'' तर काहींनी भावनिक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

Dhananjay Munde vs Manoj Jarange: धनंजय मुंडेंचा जरांगेंना विरोध की अस्तित्वाचा संघर्ष?

SCROLL FOR NEXT