RPF जवानाच्या सतर्कतेमुळे नागपूर स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना पडलेल्या तरुणीचा जीव वाचला; हा थरार सीसीटीव्हीत कैद Saam Tv
व्हायरल न्यूज

नागपुर रेल्वे स्थानकावरील थरार! प्लॅटफॉर्मवरून धावत्या ट्रेनमध्ये चढताना तरुणीचा तोल गेला; पोलिसांनी वाचवले प्राण

Nagpur Train Incident: नागपूर रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना एका तरुणीचा तोल गेल्याने ती प्लॅटफॉर्मवर कोसळली. प्रसंगावधान राखून रेल्वे स्थानकावर पोलिसांनी तिला वाचवले. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Tanvi Pol

Platform Accident: नागपूर रेल्वे स्थानकावर २८ जून रोजी सायंकाळी घडलेली एक थरारक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत एका तरुणीचा जीव थोडक्यात वाचला असून याचे संपूर्ण श्रेय रेल्वे पोलिस दलातील सतर्क जवानाला दिले जात आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले आहेत.

नेमके काय घडले आणि कसे घडले?

नागपुर रेल्वे (railway) स्थानकावरील ही घटना २८ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून पुण्याला जाणारी एक एक्स्प्रेस ट्रेन सुटण्याच्या तयारीत होती. या ट्रेनमध्ये चढण्यासाठी धावपळ करत असलेल्या एका तरुणीने चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न तिच्यासाठी जीवघेणा ठरू शकला असता.

तरुणीने ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असतानाच तिचा तोल गेला आणि ती थेट प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या जागेत पडू लागली. याच क्षणी प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या पोलिसांच्या जवानाने प्रसंगावधान राखून पळत जाऊन तिला घट्ट पकडले आणि मागे ओढले. काही सेकंद उशीर झाला असता तरुणी ट्रेनच्या चाकाखाली येऊन गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती.

ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, तरुणीचा संतुलन बिघडताच RPF जवान तात्काळ धावत जातो आणि तिचा हात पकडून जोरात मागे खेचतो. या क्षणिक निर्णयामुळे तिचा जीव वाचला. स्थानकावर उपस्थित नागरिकांनीही जवानाच्या कार्याचे कौतुक केले.

या घटनेचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी RPF जवानाच्या कर्तव्यपरायणतेचे कौतुक केले आहे. काहींनी लिहिले की, ''ही फक्त ड्युटी नव्हे, ही माणुसकी आहे'' तर काहींनी "देव त्या जवानाच्या रूपाने तिच्या मदतीला आला," असेही म्हटले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

SCROLL FOR NEXT