Girl performing emotional Marathi gavlan radu Nako Bala inside Mumbai local, enchanting fellow passengers and online viewers alike Saam Tv
व्हायरल न्यूज

मुंबई लोकलमध्ये 'रडू नको बाळा…'वर तरुणीचा जबरदस्त डान्स; VIDEO तुफान व्हायरल

Girl Dancing In Local Train: मुंबई लोकलमध्ये एका मराठमोळ्या तरुणीने 'रडू नको बाळा मी पाण्याला जाते' या गाण्यावर धम्माकेदार डान्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हजारो लोकांनी हा डान्स पाहिला आणि कौतुक केलं आहे.

Tanvi Pol

Trending Dance Video: मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नसून विविधतेचा संगम असलेलं एक शहर आहे. या शहरात प्रत्येक दिवशी हजारो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. या धावपळीच्या जीवनात काही क्षण असेही येतात जे केवळ आनंद देणारेच नसतात, तर सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय, ज्यामध्ये एका तरुणीने 'रडू नको बाळा मी पाण्याला जाते' या पारंपरिक गवळणीवर मुंबई लोकलमध्ये डान्स केला आहे.

ट्रेनमध्ये नाचणारी ही तरुणी कोण?

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक मराठमोळी तरुणी मुंबई लोकलमध्ये(Mumbai Local) डान्स करताना दिसते. 'रडू नको बाळा मी पाण्याला जाते' या गवळणीवर ती अगदी आत्मीयतेने थिरकते. तिच्या हावभावांतून आणि भावनांतून गाण्याच्या प्रत्येक ओळीचं अर्थप्रदर्शन घडताना दिसतं. तिचा आत्मविश्वास, नृत्यशैली आणि मुंबई लोकलसारख्या गर्दीच्या ठिकाणी मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद हे सर्व काही विशेष ठरतं.

व्हिडिओची सुरूवात आणि शेवट

हा व्हिडिओ मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चित्रीत करण्यात आला असून, ट्रेनमध्ये असलेल्या महिलांची गर्दी लक्षात घेता, विशेषत म्हणजे महिलांच्या डब्यात गहा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचे झाल्याचे दिसते. सुरूवातीला काही महिला आश्चर्याने बघतात, काहीजणी मोबाईल काढून शूट करतात आणि काहीजणी ताल धरतात. नृत्य संपल्यावर सर्व महिलांकडून टाळ्यांचा गजर होतो. तरुणीच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य झळकतं आणि त्या क्षणाची जादू सर्वांनाच भिडते.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

हा डान्स (Dance) व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ही कला, परंपरेचा अभिमान आणि तरुणीचा आत्मविश्वास यांचं कौतुक केलं आहे. काही म्हटलं की, ''हे केवळ डान्स नाही, तर संस्कृतीचं दर्शन आहे'' तर दुसऱ्याने लिहिलं, ''मुंबई लोकलमध्ये असा देखणा क्षण अनुभवायला मिळणं हे भाग्य''अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Vadettiwar: महाराष्ट्र २० टक्के कमिशनचं राज्य झालं, सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवारांची टीका

Krushi Samruddhi Yojana: राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार; नवी पीकविमा योजना लागू

Shravan 2025: श्रावणमध्ये कोणत्या गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते?

Ambernath Municipal: कायदा धाब्यावर; दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच फ्री-स्टाइल हाणामारी|Video

Pumpkin Seeds: भोपळ्याच्या बिया खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT