Youth’s energetic dance on ‘O Saki Saki’ steals the spotlight on social media Saam Tv
व्हायरल न्यूज

डान्स तर असा की... खुद्द नोराही खुश झाली असती; पाहा तरुणाचा भन्नाट व्हिडिओ

Viral Dance Video: एका प्रसिद्ध गाण्यावर एका तरुणाने रस्त्यावरच असा भन्नाट डान्स केला की पाहणाऱ्यांच्या नजरा थबकल्या. हा डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सगळीकडे कौतुक होतंय.

Tanvi Pol

Trending Viral Video: सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. काही व्हायरल व्हिडिओ मनोरंजनासाठी असतात,तर काही प्रेरणादायक तर काही इतके धमाकेदार असतात की पाहणाऱ्याच्या अंगातच ऊर्जा संचारते. सध्या अशाच एका तरुणाचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 'ओ साकी साकी रे' या गाण्यावर त्याने केलेला डान्स पाहून अनेकांनी थक्क होण्यासारख्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'ओ साकी साकी' गाण्याचं वेगळंच वेड

'ओ साकी साकी' हे गाणं मूळत बाटला हाउस या चित्रपटातले असून या गाण्याला आजही लाखो चाहते आहेत. त्याच्या बीट्स, एनर्जी आणि डान्स मूव्ह्स लोकांना नेहमीच खुणावत असतात. पण या तरुणाने जे काही केलं, ते नेमकं या गाण्याच्या थेट मूळ एनर्जीला साजेसं आहे.

व्हिडिओमध्ये नक्की काय आहे?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण स्टेजवर चढून 'ओ साकी साकी' गाण्यावर अफलातून डान्स करताना दिसतो. त्याचे स्टेप्स इतके सिंक्रोनाइझ आणि पॉवरफुल आहेत की क्षणभर वाटतं, हा एखाद्या मोठ्या रिअॅलिटी शोचा परफॉर्मन्स आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, स्टेप्समधली ताकद आणि लयबद्धता हे पाहून नेटिझन्सही दाद देत आहेत.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

हा डान्स व्हिडिओ(Video) सर्वप्रथम इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता आणि काही तासांतच तो व्हायरल झाला.''भारी डान्स बघायला मिळाला'', अशा कमेंट्सने कमेंट सेक्शन फुलून गेलं आहे. काही युजर्सनी तर या तरुणाला डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्याची शिफारसही केली आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honey Trap: महाराष्ट्र हनी ट्रॅपच्या विळख्यात? अखेर लोढाच्या पापाचा घडा फुटला,पोलीसच ट्रॅपसाठी फिरवायचे 'हंटर'?

jalna Shocking : जालना हादरलं! आश्रम शाळेत मध्यरात्री 8 वर्षांच्या मुलाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Weather Update: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्गसह कोल्हापूर घाट भागात ऑरेंज अलर्ट

Haunted Village: एक 'असे' झपाटलेले गाव जेथे जाण्यासाठी लोक घाबरतात, गिनीज बुक रेकॉर्डमध्येही याची नोंद

Indian Cricketers: भारताचे टॉप ५ महान क्रिकेटपटू कोण? शास्त्रींच्या यादीत विराट कोहली; वर्ल्डकप विजेत्या रोहित शर्माला वगळलं

SCROLL FOR NEXT