आपल्या घरात अनेक टाकाऊ वस्तू असतात. या वस्तू अनेक व्यक्ती फेकून देतात. मात्र घरातील टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी भन्नाट बनवता येतं. त्यासाठी तुमच्याकडे युनिक आणि जगापेक्षा थोडा वेगळा विचार करण्याची क्षमता असली पाहिजे. अशात सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. अशात सोशल मीडियावर प्रभू श्री राम यांच्या भक्तीत मग्न झालेल्या अनेक बांधवांचे व्हिडिओ पहायला मिळत आहेत. एका तरुणाने आपल्या जुन्या टिव्हीपासून सुंदर चित्र रेखाटून दाखवलं आहे. तरुणाच्या कलेची आता सर्वत्र मोठी चर्चा रंगलीये.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या तरुणाने आपल्या घरातील सर्वात जुने मॉडेल असलेला डब्बा टीव्ही घेतला आहे. त्याने या टिव्हीची काच उघडली आहे. त्यानंतर टिव्हीमध्ये त्याला अनेक छोटे छोटे पार्ट दिसले. या पासून काहीतरी भन्नाट बनवता येईल अशी कल्पना त्याच्या मनात आली.
त्यानंतर त्याने एक एक पार्ट टिव्हीवर सुंदर पद्धतीने मांडले. भिंतीवर मागे लाल रंगाचं कापड बांधलं. त्यावर त्याने काच नसलेली टिव्हीची फ्रेम ठेवली. त्यावर त्याने सर्व पार्ट लाईनीत आणि सुंदर पद्धतीने मांडले. असं करतकरत त्याने भगवान श्री रामाची प्रतिकृती साकारली.
तरुणाने टिव्ही जेव्हा प्रकाशासमोर आणला तेव्हा लाल रंगाच्या कापडावर सुदंर सावली उलटली. या सावलीत राम लक्ष्मण आणि सीमा यांची प्रतिमा पाहायला मिळाली. यासह यावर त्याने राम मंदिराच्या छटा देखील उमदवल्या आहे.
@artistshintumorya या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळालेत. अनेकांनी यावर जय श्री राम असं लिहिलं आहे. मनात ठरवलं तर आपण सर्व काही सहज करू शकतो हेच या तरुणाने दाखवून दिलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.