Dog Bite Women Face Saam TV
व्हायरल न्यूज

Dog Bite Women Face: कुत्र्याला किस करणे पडले महागात; महिलेच्या तोंडाचा घेतला चावा, थरारक व्हिडिओ व्हायरल

Viral Video: कुत्र्याने तिच्या तोंडाचा चावा घेऊन ओठांचा वरचा भाग फाडून टाकला आहे. या महिलेचे ऑपरेशन करून टाके घालण्यात आलेत. @keepitfit या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video:

अनेक व्यक्तींना प्राणी फार आवडतात. कुत्रा, मांजर पाळणाऱ्या व्यक्ती अगदी एखाद्या लहान बाळांसारखा प्राण्यांना जीव लावतात. प्रेमाने खाऊ पिऊ घालतात. मात्र असं असलं तरी ते प्राणी आहेत त्यामुळे ते पूर्णतः माणसांच्या भावना समजू शकत नाहीत. प्रण्यांसोबत वावरताना कधी काय घडेल काही सांगता येत नाही. कुत्रा पाळणाऱ्या एका महिलेसोबत विचित्र घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या महिलेने त्या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याला जवळ घेतलं आहे. कुत्र्याला जवळ घेऊन ती त्याच्यावर प्रेम करतेय.

कुत्र्याला माया आणि जीव लावत असताना ती त्याला किस करते. आपण आपल्या कुत्र्यावर किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी महिला याचा व्हिडिओ (Video) देखील काढत असते. आधी ती स्वतः त्याला किस करते आणि मग नंतर कुत्र्याने आपल्याला किस करावं असं ती त्याला सांगते.

कुत्र्याजवळ ती जसं तोंड घेऊन जाते तसं कुत्रा लगेचच तिच्यावर झडप घालतो. कुत्रा महिलेच्या तोंडाचा जोरदार चावा घेतो. यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. कुत्र्याला किस करणे तिला चांगलेच महागात पडले आहे.

कुत्र्याने (Dog) तिच्या तोंडाचा चावा घेऊन ओठांचा वरचा भाग फाडून टाकला आहे. या महिलेचे ऑपरेशन करून टाके घालण्यात आलेत. @keepitfit या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडीओ पहिला आहे. नेटकरी यावर विविध कमेंट करत असून सर्वांना प्राणी पळताना स्वतः ची काळजी घ्या असं सांगत आहेत.

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT