Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्र! ROSE DAYच्या दिवशी हे काय केलं...; तरुणीनं चक्क गुलाबाच्या फुलांची बनवली कुरकुरीत भजी

Red Rose Bhajiya Video Viral: नविन काहीतरी बनवायचं म्हणून या तरुणीमे चक्क गुलाबाचे भजी बनवलेत. आज रोज डे असल्यानं तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Ruchika Jadhav

Red Rose Bhajiya Viral Video:

फ्रेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना असं म्हणतात. कारण याच महिन्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. आता व्हॅलेंटाईन डे आधी विविध डे साजरे होतात. ज्यामध्ये चॉकलेट आणि टेडी डे पासून रोज डे तरुण तरुणी, प्रेमी युगुल साजरे करतात. अशात आज रोज डे निमित्त सोशल मीडियावर एक अतरंगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही एकतर पोट दुखेपर्यंत हसाल किंवा यातील महिलेवर राग व्यक्त कराल. कारण आज रोज डे असून महिलेने चक्क रोज म्हणजे लाल रंगाच्या गुलाबाचे भजी बनवले आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणीने गुलाबाच्या फुलांचा एक गठ्ठा आणला आहे. त्यानंतर तिने गुलाबाचे लांब देठ कापून घेतलेत आणि भजी बनवायला सुरुवात केलीये.

आपण घरामध्ये कांदा किंवा बटाटा भजीसाठी जसं बेसन पीठ बनतो तसं बॅटर तिने बनवून घेतलं आहे. त्यानंतर गुलाबाची सर्व फुलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलीत. यातील एक एक फुल तिने बेसनाच्या पिठात बुडवून कडकडीत तेलात तळून काढलं आहे. तेलात तळून महिलेने कुरकुरीत भजी बनवून घेतलेत.

@amee_kaushik_ribadiya या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. एकाने यावर कमेंट करत हा खोटा व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे. खरंतर हा व्हिडीओ १ सप्टेंबर २०२३ रोजी पोस्ट करण्यात आला होता. मात्र आज रोज डे असल्याने हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: फक्त जास्त मीठानेच ब्लड प्रेशर वाढत नाही; साध्या वाटणाऱ्या या 6 सवयीही ठरतायत कारणीभूत

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT