Mumbai Local Train Fight Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मराठीत बोलणार नाही तर महाराष्ट्रात ठेवणार नाही; लोकलमध्ये हिंदीत बोलणाऱ्या तरुणीवर महिला भडकली, VIDEO

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलमध्ये भाषेवरून महिलांमध्ये तुफान भांडण! मराठीत न बोलल्याने एका महिलेनं दुसरीला सुनावलं. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

ट्रेनमध्ये महिलांची भांडणे झाली अश्या घटना तुम्ही नेहमीच ऐकल्या असतील. ट्रेनमध्ये महिलांमध्ये भांडणे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अनेकदा जागेवरून महिलांची ट्रेनमध्ये तुफान हाणामारी देखील होते. मात्र आता ट्रेनमधील महिलांमध्ये जागेवरून नाहीतर भाषेवरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर महिलांचा ट्रेनमधील भांडणाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे ट्रेनमध्ये एका महिलेने मराठी न बोलणाऱ्या या महिलेशी भांडण केले आहे. तिने यादरम्यानचा व्हिडीओ देखील बनवला आहे.

या व्हिडीओमध्ये, एका महिला तिच्या मुलीला मांडीवर घेऊन बसलेली आहे. दरम्यान या महिलेचे एका मराठी न बोलणाऱ्या महिलेशी भांडण होते. प्रथम ही महिला त्या महिलेला मराठी भाषेत बोल असं म्हणत आहे. पण दुसरी महिला तिचं न ऐकता तिच्याशी भांडण करताना दिसते आहे. या महिलेने तिचा लाईव्ह व्हिडीओ काढण्याची धमकी दिली आहे. दरम्यान या दोघीमध्ये भांडण सुरू असताना छोटी मुलगी रडू लागते एक दुसरी महिला त्या मुलीला तिच्याकडे घेते.

लाईव्ह व्हिडीओमध्ये, हि महिला, मी मराठीत बोलते. मी माझ्या महाराष्ट्रात आहे. आमचा महाराष्ट्र आहे. तु पण मराठीतच बोल. तू मराठीत बोल.. मराठीमध्ये बोलता येत नसेल तर, महाराष्ट्रात ठेवणार नाही अशी धमकी देत आहे. तेवढ्यात त्या महिलेचे बाळ देखील रडू लागते. पुढे ही महिला हे संपूर्ण प्रकरण आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करते. दोघांमध्ये २ मिनिटे ४४ सेकंद हे भांडण सुरू होते. सोशल मीडियावर देखील या दोघींच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ट्रेनमधील प्रवासी दोघांनाही शांत राहण्यास सांगताना दिसत आहे.

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

Nanded Accident : गणेश भक्तांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Mumbai Konkan Ro Ro Ferry : तळकोकणात पोचा अवघ्या पाच तासात; आता मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा, VIDEO

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

SCROLL FOR NEXT