Kerosene Fridge Video Saam TV
व्हायरल न्यूज

Kerosene Fridge Video: वीजेवर नाही तर रॉकेलवर चालणारा फ्रीज; १०० वर्ष जुन्या वस्तूचा व्हिडिओ व्हायरल

Without Electricity Fridge : आठवड्याला आणलेली भाजी अगदी आठवडाभर ताजी राहते. प्रत्येक घरामध्ये चालणारा फ्रिज वीजेवर चालतो. मात्र सोशल मीडियावर एक जुना फ्रिज जोरदार व्हायरल होतो. हा फ्रिज वीजेशिवाय काम करतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video:

थंड पाणी किंवा पदार्थ जास्त वेळ टिकावेत ते खराब होऊ नयेत यासाठी आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या घरात फ्रीज आहे. फ्रिजमध्ये सर्व प्रकारचे अन्नधान्य भरून ठेवले जातात. आठवड्याला आणलेली भाजी अगदी आठवडाभर ताजी राहते. प्रत्येक घरामध्ये फ्रिज वीजेवर चालतो. मात्र सोशल मीडियावर एक जुना फ्रिज जोरदार व्हायरल होतोय. हा फ्रिज वीजेशिवाय काम करतो.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने दुकानामधून हा जुना फ्रीज शोधून काढलाय. त्या फ्रीज बद्दल सदर व्यक्ती संपूर्ण माहिती देत आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे हा फ्रीज वीजेवर नाही तर रॉकेलवर चालत आहे. पूर्वीच्या काळी अनेक घरांमध्ये स्टो वापरला जायचा. स्टो रॉकेलवर चालत होता. तसाच हा फ्रीज देखील रॉकेलवर सुरू होतो. दहा लिटर रॉकेलवर हा फ्रीज चालत असल्याचं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

रॉकेलचा टँक फ्रिजमध्ये मागच्या बाजूला लावला जातो. इतर फ्रीज प्रमाणेच या फ्रीजचे डिझाईन आहे. रॉकेलचा टाईम तुम्ही स्वतः देखील काढू शकता. त्यातील रॉकेल संपल्यानंतर पुन्हा त्यामध्ये रॉकेल ओतून फ्रीज वापरू शकता. या फ्रीजवर हिमलक्स कंपनीचे नाव लिहिण्यात आले आहे. सदर फ्रीज सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आलाय.

आपल्या घरामध्ये असलेल्या फ्रीजप्रमाणे या फ्रीजचे डिझाईन आहे. केरोसीन टॅंकमध्ये लेवल देखील बसवण्यात आली आहे. तुम्ही यामध्ये किती प्रमाणात केरोसीन म्हणजेच रॉकेल भरू शकता याचे माप यावर देण्यात आले आहे. हा व्हिडिओ @IndianDesiTraveller इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

रॉकेलवर चालणारा फ्रीज पाहून नेटकरी हैरान आहेत. पूर्वीच्या काळी देखील टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर वीकसित होती हेच हा व्हिडिओ पाहून समजते. सोशल मीडियावर वीजेव्यतिरिक्त इतर काही इंधनांवर चालणारे अनेक फ्रीजचे व्हिडिओ आजवर वायरल झालेत. काही वर्षांपूर्वी शालेय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने असाच फ्रीज बनवला होता. मात्र यावेळी त्याने रॉकेलचा देखील वापर केला नव्हता. सुतळीपासून बनवलेल्या गोण्या आणि कोळशाचा वापर करून त्याने हा फ्रीज बनवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT