viral satya saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: इन्स्टा, फेसबूकसाठी पैसे मोजावे लागणार महिन्याला करावा लागेल प्लान रिचार्ज? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Meta paid policy: तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरता का...? या प्रश्नाचं उत्तर होयच असेल...कारण, फेसबुक, इन्स्टाग्राम कुणाच्या मोबाईलमध्ये नसेल असं होऊच शकणार नाही...मात्र, आता तुम्हाला फेसबुकसाठी पैसे मोजावे लागणार आहे...होय, असा दावा करण्यात आलाय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

...तुम्ही फेसबुक, इन्स्टा वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल रिचार्जसारखा प्लान खरेदी करावा लागणार आहे...होय, कारण आता फुकटचं फेसबुक, इन्स्टा वापरणाऱ्यांसाठी मेटा भुर्दंड लावणार आहे...तसा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...इन्स्टा आणि फेसबुक असलं की आजूबाजूला बोलायला कुणीही नसलं तरी चालतं...तासन् तास लोक फेसबुक, इन्स्टावर वेळ घालवतायत...फोटो, व्हिडिओ शेअर करणे, दुसऱ्यांचे फोटो पाहणे, लाईक्स, शेअर, कमेंट्स, पोस्ट लिहिणे हा सगळा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो...त्यामुळे खरंच आता इन्स्टा, फेसबुकसाठी पैसे लागणार आहेत का...? याची पडताळणी करणं गरजेचं आहे...देशभरात इन्स्टा, फेसबुकचे कोट्यवधी युर्जस आहेत...त्यामुळे याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने या दाव्याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

फेसबुक, इन्स्टाग्राम तुम्ही वापरत असाल तर आता पैसे मोजावे लागतील. कारण, मेटा आता पेड पॉलिसी लागू करणार आहे. त्यामुळे तुम्हाला महिन्याला भुर्दंड लागणाराय.

हा दावा केल्याने आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत माहिती मेटाकडूनच मिळू शकते...त्यामुळे आमच्या टीमने मेटाकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला...खरंच मेटा आता फेसबुक, इन्स्टासाठी पैसे लावणार आहे का...? हे जाणून घेतलं...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

मेटाकडून इन्टा, फेसबुकसाठी पेड पॉलिसीचा विचार

मेटा एक कॉम्बो ऑफर लाँच करू शकते

जाहिरात-मुक्त एडिशन 1,445 रुपये प्रति महिना

हे फीचर फक्त डेस्कटॉप युजर्ससाठीच असेल

जाहिराती न पाहणाऱ्यांसाठी पेड पॉलिसीचा विचार

आपल्या देशात इन्स्टा, फेसबुकवर पैसे लागू करण्याबाबत सध्या विचार नाहीये...सध्या ब्रिटनमध्ये यावर विचार सुरू आहे...मात्र, भविष्यात फेसबुक, इन्स्टाग्रामसाठी पैसे मोजावे लागू शकतात...त्यामुळे आमच्या प़डताळणीत मेटा फेसबुक, इन्स्टासाठी पैसे लागणार असल्याचा दावा सत्य ठरला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT