Wife loses temper during meal dispute and thrashes husband; shocking visuals go viral. Saam Tv
व्हायरल न्यूज

अरे बापरे! जेवणावरून वाद वाढला; बायकोचा संताप होऊन नवऱ्याला कुट कुट कुटले

Wife Beats Husband: जेवणावरून नवरा-बायकोमध्ये वाद झाला आणि क्षणात बायकोचा संताप इतका वाढला की तिने नवऱ्याला अक्षरशः कुटून काढलं. हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Viral Couple Fight: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला आपल्या पतीला हाताने मारताना दिसते. कारण काय तर जेवणावरून झालेला वाद. तुम्हीही एकदा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा.

व्हायरल (Viral) व्हिडिओमध्ये दिसतं की एका घरात पती-पत्नी जेवत आहेत. पहिल्या काही सेकंदांत दोघंही शांतपणे बसलेले दिसतात. पण काही क्षणांत बायको संतप्त होते आणि नवऱ्याशी वाद घालू लागते. आवाज वाढतो, आणि अचानक ती चिडून उठते,ती पुन्हा पुन्हा त्याच्यावर हात उगारते. सर्व प्रकार नवऱ्याने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या कृत्याचं समर्थन केलं नाही, तर काहींनी हसत-हसत मिम्स तयार केले. मात्र, ज्यांनी याकडे गांभीर्याने पाहिलं, त्यांचं म्हणणं आहे की, ''घरगुती हिंसाचार कोणत्याही बाजूकडून असो, तो चुकीचाच आहे.''काही रिपोर्ट्सनुसार, पतीने बायकोने केलेल्या जेवणावर टीका केली, त्यामुळे बायको संतापली. स्वयंपाकावर टीका होणं तिला सहन झालं नाही आणि तिने रागाच्या भरात नवऱ्यावर हात उगारला.

हा व्हिडिओ(Video) सध्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर (X) यांसारख्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कंमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर यापूर्वीही पती-पत्नीच्या हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, मात्र सध्याचा हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! या बँकेचे लायसन्स केले रद्द; तुमचं खाते नाही ना?

Guruwar che Upay: गुरुवारच्या दिवशी करा 'हे' ५ उपाय; घरात येईल धन-समृद्धी

Mumbai : मुंबईकरांनो सावधान ! 26 जुलैला समुद्रात उसळणार मोठ्या लाटा | VIDEO

आपटून आपटून कुणाला मारणार? महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी दुबेंना विचारला जाब, संसदेत राडा

SCROLL FOR NEXT