सर्व फळांमध्ये सफरचंद या फळाला सर्वात जास्त मागणी असते. सफरचंद हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सफरचंद फळ खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि त्वचाही चमकू लागते. कोणी आजारी असेल तर त्यांना बहुतांश सफरचंद खायला दिला जातो. डॉक्टरांच्या पसंदीत सुद्धा सफरचंदला महत्त्व आहे. सफरचंद हे काश्मिरी फळ आहे. त्याच उत्पादन थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात होत असतं. लाल सफरचंद आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं.
परंतु तुम्ही खात असलेलं लालभडक सफरचंद विषारी आहे, असं आम्ही म्हंटलं तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होतोय. एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या गोलाकार सफरचंदाला (Apple) लाल रंग लावत आहे. पांढऱ्या रंगाचे सफरचंद लाल भडक करून ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या व्हिडीओतून दिसत आहे. सर्वसामान्य ग्राहकांना हेच लाल सफरचंद विकले जात आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
या व्हिडीओतून एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या सफरचंदाला ब्रशने लाल रंग लावत असल्याचं दिसत आहे. लाल रंग लावल्यावर हे विषारी सफरचंद तयार केल्याचं दिसत आहे. हा #mnojbhoyar767 या सोशल मीडिया ॲप अंकाऊटवरून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सफरचंद खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?
तुम्ही जर तुमच्या डाएटमध्ये सफरचंदाचा समावेश करत असाल, तर सफरचंद खरेदी करताना चांगल्या ठिकाणांहून खरेदी करा. रस्त्याच्या ठेल्यावरून सफरचंद खरेदी करू नका. तसेच सफरचंद खाण्यापूर्वी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. खराब सफरचंद पोटात गेल्यास ॲसिडीटीचा त्रास उद्भवू शकतो. तसेच आपली पचनक्रिया देखील बिघडते. शरीराला इंफेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे सफरचंद खरेदी करताना त्याचा दर्जाची नक्की पडताळणी करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.