छत्तीसगडमधील दोन जिल्ह्यांसाठी शुक्रवार काळ ठरलाय. तिथे वेगवेगळ्या कारणांमुळे विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. जांजगीर येथील घटनेत विहिरीत विषारी वायू गळतीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला, तर कोरबा येथे पडलेल्या वडिलांना वाचवण्यासाठी मुलीने विहिरीत उडी मारली होती, त्यानंतर कुटुंबातील आणखी दोन जण विहिरीत उतरले. त्यांचाही मृत्यू झालाय.
नक्की काय घडलं?
जांजगीरमध्ये चंपा येथे ही घटना शुक्रवारी ५ जूलै रोजी सकाळी साडेसात वाजता (Chhattisgarh News) घडली. यानंतर गावात शोककळा पसरली होती. विहिरीत पडलेली लाकडं काढण्यासाठी एक व्यक्ती विहिरीत उतरला होता. परंतु विहिरीत विषारी वायू असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी शेजारी राहणारे चारजण एक एक करून खाली उतरले होते, मात्र त्यातील कोणीही जिवंत बाहेर येऊ शकले नाही. त्यांचाही विषारी वायुमुळे मृत्यूही झाल्याचं समोर आलंय.
विषारी वायूमुळे मृत्यू
विषारी वायुमुळे एकापाठोपाठ एक विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू (Poisonus Gas) झाला. आजूबाजूच्या लोकांना माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि बिररा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. एसडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलंय. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं असल्याची माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत (Gas Leakage) आहे.
विहिरीत पडून मृत्यू
दुसऱ्या घटनेत कोरबा जिल्ह्यातील कटघोरा पोलीस ठाण्यांतर्गत जुराली गावातील डिपारापारा येथे विहिरीत बुडून चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेत वडिल विहिरीत पडल्यानंतर मुलीने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली (People Death) होती. यानंतर कुटुंबातील इतर दोन सदस्यही विहिरीत उतरले होते. मात्र, त्या सर्वांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली होती. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आणि बचावासाठी एसडीआरएफ टीमला घटनास्थळी पाचारण केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.