Viral Wedding Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Wedding Video: अरे देवा! हुड्यांत कार दिली नाही म्हणून लग्नातूनच पळून गेला नवरदेव, Video व्हायरल

Viral Wedding Video: सध्या सोशल मीडियावर लग्नातला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लग्नातून नवरदेवाने पळ काढला आहे. जो पाहून तुम्हाला देखील धक्काच बसणार आहे.

Manasvi Choudhary

एप्रिल महिना म्हटलं की सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू होते. शहरापासून ते गावाखेड्यात लग्नाचे सोहळे पार पडतात.सोशल मीडियावर देखील लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. केळवणापासून ते सप्तपदी या खास क्षणाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तर कुठे नवरदेव आणि नवरी यांच्या एन्ट्रीचे देखील व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर लग्नातला व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.जो पाहून तुम्हाला देखील धक्काच बसणार आहे.

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. दोघांतील प्रेम , विश्वास आणि समजूतदारपणा हा नात्यात दिसून येतो मात्र सध्या लोभ आणि हुंडा यामुळे लग्नाला एक वेगळच रूप दिसून येतं आहे. आजही अनेक ठिकाणी लोकं हुंडा मागणीला समोर जात आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भर लग्नात नवरदेवाने हुंडा मिळाला नाही म्हणून पळ काढला आहे. सोशल मीडियावर सध्या या लग्नाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमधली नेमकं काय घडलं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेतातून एक व्यक्ती जाताना दिसतो आहे. या व्यक्तीच्या डोक्यावर केशरी रंगाचा फेटा घातलेला दिसत आहे. त्याच्यामागे अनेक मंडळी पाठलाग करताना दिसत आहे. व्हिडीओतून मिळालेल्या माहितीनुसार, शेतातून जात असलेला हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून एका लग्नातील नवरदेव आहे. हा नवरदेव लग्नातून पळून जात असल्याचं चित्र दिसत आहे. या नवरदेवाच्या मागे लग्नातली वऱ्हाडी मंडळी देखील जात आहे. हुंडा न दिल्याने नवरदेवाने स्वत:च्या लग्नातून पळ काढला आहे.

काय होती नवरदेवाची अपेक्षा?

नवरदेवाने मुलीच्या घरच्यांकडे हुंड्याची मागणी केली होती. पण ही मागणी पूर्ण न झाल्याने तो रागाने लग्नातून निघून जाताना दिसतो आहे.हा नवरदेव त्याच्या रागाने जात आहे. वरदेवाने मुलींच्या घरच्याकडे स्कॉर्पिओ गाडी मागणी केली होती. लग्नाच्या दिवशी ही मागणी पूर्ण होईल असे त्याला वाटले होते मात्र तसे झाले नसल्याने त्याने त्याने लग्नातून पळ काढला आहे.@Ghar Ke Kalesh या X हॅडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT