Viral Wedding Video Saatv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे देवा! लग्नाला आलेल्या पाहुण्यांनाच स्वयंपाकाला जुंपलं; व्हिडिओ तुफान व्हायरल

Gangappa Pujari

Viral Video News:

लग्नसराई म्हणजे पाहुण्यांची तौबा गर्दी. या पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यासाठी त्यांच्या पाहुणचारात कोणतीही कमतरता राहू नये, याची नेहमीच काळजी घेतली जाते. पाहुण्यांसाठी जेवणांची खास सोय केलेली असते, ज्यामध्ये नाना पदार्थ असतात. मात्र सोशल मीडियावर सध्या एका लग्नातील व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्ये चक्क लग्नाला आलेली पाहुणेमंडळीच जेवण बनवताना दिसत आहेत. काय आहे या व्हिडिओची व्हायरल स्टोरी, जाणून घ्या...

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडिओ पाहून कधी आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी हसूही येते. सध्या असाच एका लग्नातील व्हिडिओ माध्यमांवर (Wedding Video) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क लग्नात आलेले पाहुणेच स्वयपाक करताना दिसत आहेत.

लग्नसोहळ्यासाठी नटून-थटून आलेली पाहुणे मंडळी चक्क रोटी, पापड भाजताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका हॉलमध्ये पाहुण्यांची गर्दी दिसत आहे. लग्न समारंभासाठी नटूनथटून सुटाबुटात आलेले लोक दिसत आहेत. सर्वांची जेवणाची लगबग सुरू आहे. मात्र हे जेवण स्वतःच्या हाताने बनवून ते ताटामध्ये वाढून घेत असल्याचे दिसत आहे. एका हातामध्ये ताट आणि दुसऱ्या हाताने पापड, रोटी भाजून घेत जेवण करत आहेत.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. लग्नात आलेल्या पाहुण्यांनाच स्वयपाकाला बसवलं म्हणजे मानलंच पाहिजे, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्यात. तर काही जणांनी खर्च टाळण्यासाठी ही चांगली आयडिया असल्याचेही म्हणले आहे. दरम्यान, हा मजेशीर व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satyendar Jain Bail: सत्येंद्र जैन 873 दिवसांनी तुरुंगाबाहेर, आप नेत्याचा जामीन मंजूर; कोणत्या प्रकरणात झाली होती अटक? वाचा...

Health Tips: बदामाची पावडर दुधात टाका अन् मिळतील आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

SCROLL FOR NEXT