Cctv Footage saam digital
व्हायरल न्यूज

Cctv Footage: मेरठमध्ये दुचाकीस्वार आणि बिबट्याची नजरानजर; १८ सेकंदांचा VIDEO व्हायरल

Viral Video: पुन्हा मेरठ शहरातील कांकेर परिसरात शुक्रवारी रात्री बिबट्या दिसून आला. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Meerut News

उत्तर प्रदेशामधील मेरठमध्ये काही काळापासून सातत्याने बिबट्या दिसण्याच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम होते. तितक्यातच पुन्हा मेरठ शहरातील कांकेर परिसरात शुक्रवारी रात्री बिबट्या दिसून आला. परिसरातील नजीकच्याच सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली असून सध्या या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, (ता.१) मार्च शुक्रवार रोजी मेरठ शहरातील कांकेर खेरा परिसरात रात्रीच्या दरम्यान एक व्यक्ती दुचाकीवरुन जात असताना त्याच्या समोरुन बिबट्या रस्त्या ओलांडताना दिसला परंतू दुचाकीचा वेग कमी असल्याने संभाव्य अनर्थ होता होता टळला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, संपूर्ण प्रकार एका घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत आहे. तेवढ्यात घराच्या बाहेरील रस्त्यावर सारख्याच वेळेला एक व्यक्ती दुचाकीवरुन येत आहे आणि घराच्या समोरील काही झाडीमधून एक बिबट्या घराकडे येण्याचा प्रयत्नात असतो मात्र दुचाकीच्या हेडलाईटचा उजेड बिबट्यावर पडताच बिबट्या वेगाने रस्त्या ओलांडून दुसरीकडे जाताना दिसतो. दुचाकी चालक बिबट्याला पाहून काही क्षणासाठी थांबला आणि बिबट्या गेल्यानंतर तो पुढे गेला.दुचाकीचा वेग कमी असल्याने पुढे होणारा मोठा अनर्थ टळला गेला आहे.

मेरठमधील धक्कादायक घटना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @SachinGuptaUP या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओ लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर याआधीही अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत ज्यात बिबट्याचा वावर होताना दिसला आहे,कधी घराच्या बाहेर तर कधी शेतात मात्र काहीवेळा बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक नाहक बळी गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT