Japanese Tourist viral Video: सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक जपानी तरुण मुंबईत फिरताना स्पष्ट, सुरेख मराठीत संवाद साधताना दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह, मराठी भाषेबद्दल असलेला आदर आणि मुंबईबाबतचा प्रेमभाव पाहून प्रत्येक मराठी माणसाचे हृदय आनंदाने भरून येत आहे.
सध्या इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका स्थानिक कंटेंट क्रिएटरने शूट केलेला असून, त्यात एक जपानी तरुण टॅक्सीमधून जात असतो. मुंबई शहरातून प्रवास करताना तो टॅक्सीवाल्याशी मराठीतून संवाद साधत आहे. दोघांचे संवाद अतिशय भारी असे आहेत.
हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील shige_japaniguruji या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. ऐवढेच नाही तर असंख्य नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ फेसबूक, ट्वीटर अशा अनेक प्रसिद्ध सोशल मीडिया माध्यमांवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे.
हा व्हिडीओ अपलोड होताच काही तासांतच हजारो व्ह्यूज, लाईक्स आणि शेअर मिळाले. अनेक मराठी नेटकऱ्यांनी कमेंट करत तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला. "तुमच्यासारख्या व्यक्तीमुळे आमच्या भाषेचा अभिमान वाटतो," असे एका नेटकऱ्याने लिहिले. तर काहींनी थेट मराठीत त्याच्याशी संवाद साधत त्याला अजून शब्द शिकवायला सुरुवात केली. एका यूजरने म्हटलं,"मराठी माणसाच्या काळजाला भिडणारा व्हिडीओ आहे हा," असे म्हणत अनेकांनी व्हिडीओ आपल्या स्टोरीजमध्ये शेअर केला.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.