Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video : विना हेल्मेट बाईस्वाराला अडवलं, संतापलेला तरुण पोलिसाला चावला; VIDEO व्हायरल

Bengaluru Viral Video: सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे,ज्यात एका वाहन चालकाने हेल्मेट न घातल्यामुळे पोलिस त्याच्यावर कारवाई करतात तेव्हा चक्क तो पोलिसांच्या हाताला चावतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Man Bites Cop Finger

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. हायवे असो किंवा शहरातील रस्ते यावर वाहन चालवण्यासाठी वाहतुक शाखेने विशिष्ट असे नियम आखून दिलेले आहेत. हायवे असेल तर वाहनाचे स्पीड आणि शहरातील रस्ते असेल तर स्पीड आणि हेल्मेट हे वाहन चालकाने घातलेले पाहिजेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र असे असून ही भेभान असलेले काही वाहन चालक हेल्मेट घालत नाही जर त्यामध्ये त्याच्यावर कारवाई केली जाते तेव्हा काही वाहन चालक पोलिसांशी आरेरावी करतात,अशातच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे,ज्यात एका वाहन चालकाने हेल्मेट न घातल्यामुळे पोलिस त्याच्यावर कारवाई करतात तेव्हा चक्क तो पोलिसांच्या हाताला चावतो.

एक दिवस संपत नाही तो पर्यंत पोलिसांवर होणारे हल्ले थांबायच नाव घेत नाहीत. कधी पोलिसांना धावत्या कारने धडक मारल्याच्या घटना समोर येतात तर कधी पोलिसांसोबत हाणामारीच्या घटना घडतात. नागरिकांच्या सुक्षतेसाठी असलेल्या पोलिसांवर काही नागरिकांकडून हल्ले केले जात आहेत. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसते की,' दोन वाहतुक पोलिसांनी एका व्यक्तीला रस्त्याच्या बाजूला थांबवले आहे. थांबलेला व्यक्ती एक वाहन चालक आहे ज्याने वाहन चालवताना हेल्मेट घातलेले नाही. वाहतुकीच्या नियमातील असलेल्या या नियमाचे पालन न केल्याने त्या दोन पोलिसांनी त्याला कारवाई करण्यासाठी वाहनावरुन उतरण्यास सांगत होते. उतरण्यास सांगितल्यावरीही तो काही ऐकत नव्हता.जेव्हा पोलिसांनी त्याला हाताला धरुन उतरण्यास लावले तो चक्क एका पोलिसांच्या हाताला चावला. त्यानंतर त्याचे वाहन एका बाजूला घेऊन त्याला पकडले.

व्हायरल व्हिडिओ बगंळूरमधील असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या पेजवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केल्या आहेत. व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Calcualtion: आता शेतजमीनीची मोजणी फक्त २०० रुपयात होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र, सोलापुरातील राजकारण फिरणार

Chinmayee Sumeet : "होय मी जयभीमवाली..."; चिन्मयी सुमितचं बेधडक वक्तव्य

Shivani Rangole Photos: शिवानीचं मराठमोळं सौंदर्य! जांंभळ्या साडीत दिसतेय खूपच भारी

SCROLL FOR NEXT