देशभरातील कोणत्याही पोलिसाचं नुसतं नाव ऐकलं तरी गुन्हेगारांचे धाणे दणाणतात. पोलिसांचे सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ,त्यात कधी पोलिसांवर हल्ले झालेले आपल्याला पाहायल मिळतात तर कधी पोलिसांचे शौर्याचे. पोलीस म्हटलं की शिस्त, त्यांचा एक रुबाब या गोष्टी आपल्याला दिसतात ,त्यातत सोशल मीडियावर मध्य प्रदेशमधील पोलिसांशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जिल्ह्याचे ASP आपल्याच कॉन्स्टेबलवर संतापले आहेत. नक्की प्रकरण तरी काय पाहुयात.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उत्तर प्रदेशातील आझमगड येथे गेले होते तिथे त्यांनी एका कार्यक्रमात उपस्थित दाखवली होती त्याच्या सोबत जे पोलिस कर्मचारी होते त्या दरम्यान हा प्रकार झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, कार्यक्रमात अनेक व्यक्ती सहभागी झालेले दिसत आहेत. त्यातील काही लोक जेवत असून त्यादरम्यान एका हवलदाराने जेवण करण्यास सुरुवात केली मात्र SPनी त्यांना जेवताना पाहिले आणि फटकारले आणि एसपी त्यांना म्हणाले की,'इथे ड्युटीवर आलात जेवायला?कार्यक्रम झाला की जेवा,चला आता तिकडे'. तिथे असलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये लपवून व्हिडिओ कैद केला असून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
सोशल मीडिया एक्सवरील@Salahuddin_307या पेजवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.एका यूजरने लिहिले आहे की,' त्या हवलदाराची काय चूक ' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,'जर त्यांना भूक लागली होती तर त्यांनी वरिष्ठांना सांगून जेवायला पाहिजे होते तर आणखी एका यूजरने लिहिले आहे,' सांगण्याची पद्धत चुकली'.
पोलिसांचे स्पष्टीकरण...
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आझमगड पोलिसांच्या वतीने स्पष्टीकरण देत म्हणाले की,' आझमगड जिल्ह्यात मध्य प्रदेशच्या माननीय मुख्यमत्र्यांच्या कार्यक्रमा दरम्यान काही ऑन ड्युडीवर असलेले काही पोलिस कर्मचारी त्यांना ड्युडीच्या ठिकाणी उपस्ठित दिसले नाही त्यामुळे त्यांना परत पाठवण्यात आले त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.