Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: फोनची हौस लयचं बेकार! पाण्यात पडला तरी कॉलवर... ;हसावं की रडावं? तुम्हीच सांगा

Funny Viral Video: मोबाईलच्या आहारी गेल्याने एक व्यक्तीचा पाण्यात तोल जाता जाता वाचतो,सध्या सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडिओची चर्चा सुरु आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Man Fell Into The Water

सध्या लहानापासून ते मोठ्यापर्यंत मोबाईलचा अतिवापर वाढलेला आहे. प्रत्येकजण मोबाईलवर खूप अवलंबून आहे. मोबाईलचे एक व्यसनचं व्यक्तीला लागले आहे. आपल्या आजूबाजूला एकही व्यक्ती सापडणार नाही जो मोबाईल वापरत नाही. या मोबाईल फोनचे तसे अनेक फायदे ही आहेत,पण कधी कधी तो जीवघेणाही ठरतो. अशातच मोबाईलच्या आहारी गेल्याने एक व्यक्तीचा पाण्यात तोल जाता जाता वाचतो,सध्या सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडिओची चर्चा सुरु आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोबाईलच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस आरोग्यासंबंधित अनेक समस्या व्यक्तींना जाणवत आहेत. सोशल मीडियावर या आधी मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक व्यक्तींचे जीव गेले आहेत तरी काही थरारक अपघातही मोबाईलच्या अतिवापरामुळे झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक व्यक्ती स्विमिंग पुलच्या अगदी बाजूलाच फोनवर बोलत आहे. फोनवर बोलत चालत असताना स्विमिंग पुलच्या काठावर त्याचा पाय सरकतो आणि तो स्विमिंग पुलमध्ये पडता पडता वाचतो. आश्चर्यांची गोष्ट म्हणजे पडता पडता वाचला तरी त्याचे फोनवर बोलणे काही थांबले नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील@InternetH0Fया एक्सपेजवर शेअर करण्यात आला आहे. याआधीही सोशल मीडियावर फोनवर बोलताना कोण गाडी चालवत आहे तर कोणी रेल्वे रुळ ओलाडंत आहे. व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओवर अनेक भन्नाट प्रतिक्रिया ही केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT