Heart Attack While Dancing Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: नाचता नाचता खाली कोसळला, तरुणाचा क्षणात जीव गेला.. मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद; VIDEO

Heart Attack While Dancing Viral Video: नाचता नाचता कोसळला... मृत्यूचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Andhra Pradesh Shoking Video: मृत्यू कधी अन् कोणत्या रुपात येईल हे सांगणे अशक्य.. अगदी चालता- बोलता, हसता- खेळता मृत्यू आल्याचे अनेक प्रसंग आजपर्यंत ऐकले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक मन सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणाचा नाचता नाचताच खाली कोसळून त्याचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे.

नाचता नाचता मृत्यूने गाठले...

हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिममध्ये व्यायाम करताना, चालता बोलता हृदयविकाराचा झटका आला अन् मृत्यू झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असतील. आंध्रप्रदेशमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गणेश चतुर्थी (Ganapati Festival 2023) दिवशी मंडपात नाचता नाचताच हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आंध्र प्रदेशातील धर्मावरम येथे घडली. प्रसाद (वय 26 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. हा मृत्यूचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

आंध्रप्रदेशातील घटना...

आंध्रप्रदेशच्या धर्मावरम गावात गणेश चतुर्थीचा जल्लोष सुरू होता. यावेळी सजवलेल्या गणेश मंडपात प्रसाद आपल्या मित्रांसोबत डान्स करत होता. नाचता नाचताच अचानक तो खाली कोसळला. अचानक झालेल्या या घटनेने सर्वजण घाबरुन गेले. घटनेनंतर त्याला आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ रुग्णालयात नेले.

मात्र उपचारापुर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल!

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी हृदयविकाराचा धोका सर्वच वयोगटांमध्ये दिसत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. तर काही जणांनी डीजेच्या आवाजाने हृदयविकाराचा धोका जास्त असतो, असेही सांगितले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका जीम ट्रेनरचा जीममध्ये वर्कआऊट करताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ballaleshwar Temple Pali : नाद करायचा नाय! पूजेचं साहित्य विकणाऱ्या मराठी व्यावसायिकचा दुकानात आलेल्या विदेशी पर्यटकांसोबत थाई भाषेतून संवाद; पर्यटक आवाक

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची पत्रकार परिषद

OBC Reservation : मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार? वकील योगेश केदार यांनी सांगितली अडचण, आता नवी मागणी चर्चेत

Nepal Protest: नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उत्तर प्रदेशला फटका; जाणून घ्या काय आहे कारण?

उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT