Dance Video Viral Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Video Viral: तरूणाची गौतमी पाटीलला टक्कर; 'पाव्हणं इचार काय हाय तुमचा?' गाण्यावर केला भन्नाट डान्स, Video

Lavani Dance Video Viral: शाळेतील मित्रांच्या भेटीत तरुणाने “पाव्हणं इचार काय हाय तुमचा?” या लावणीवर भन्नाट डान्स केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं.

Manasvi Choudhary

शाळा आणि शाळेतील आठवणी या आजही प्रत्येकालाच रडायला भाग पडतात. आजकाल शाळेतील मित्र- मैत्रिणींना भेटून त्याच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा ट्रेंड सुरू आहे. सोशल मीडियावर देखील आजकाल शाळेतील मित्र- मैत्रिणीची बरीच वर्षांनी भेट झालेले व्हिडीओ पाहायला मिळतो. मित्र- मैत्रिणी भेटल्यानंतर त्याच्यासोबत आपण काही करू शकतो. मित्र -मैत्रिणीचं नातं काहीसं असच असतं.

पुरूष असो वा स्त्री अनेकांना नृत्याची आवड असते. तालासुरात अगदी मनमोहक नाचणारे काही कमी नाही. कोणत्याही वयात आणि कोणत्याही ठिकाणी आपला छंद जोपासणारे देखील अनेक आहेत. अशातच सोशल मीडियावर सध्या एका तरूणाचा लावणी डान्सचा व्हिडीओ धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल एखादी लावणी कलाकार यांच्यासमोर फिकी पडेल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेतील जुने मित्र-मैत्रिणी बरीच वर्षाने एकमेकांना भेटले आहेत. यावेळी एका तरूणाने 'पाव्हणं इचार काय हाय तुमचा?' या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. त्याने अत्यंत तालासुरात या लावणीवर डान्स केलेला पाहायला मिळतो. यावेळी उपस्थितासह सर्वांनाच टाळ्यांनी त्याचे कौतुक देखील केले आहे.

सोशल मीडियावर @rajdancer2021 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. लाखो लोकांनी या व्हिडीओला पसंती दिली असून नेटकऱ्यांनी तरूणाच्या नृत्याचे कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनी प्रतिक्रियामध्ये 'खूप छान डान्स केला भाऊ' , 'एखाद्या बाईला लाजवेल अशी लावणी आहे, खरच जितका वेळा बघितली तरी मन भरत नाही दादा खुप खुप छान','खरच हवा केली भावा तू एक तरी अंगी असावी कला' असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

SCROLL FOR NEXT