Dance in Running car Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Delhi Car Video: वाहनांची वर्दळ, सुसाट कार अन् तरुणीचा बिंधास्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

Dance in Running car Video: व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हुल्लडबाजी करणे योग्य नसल्याचे म्हणत खडेबोल सुनावले आहेत.

Gangappa Pujari

Delhi Car Viral Video:

बाईक, कार चालवताना भलती स्टंटबाजी करण्याची काही लोकांना फार हौस असते. अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, फेमस होण्यासाठीही तरुण- तरुणी अनेक स्टंट करत असतात. पण असे स्टंट जीवावरही बेतू शकतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल असतात. कधी जबरदस्त डान्स, कधी मेट्रोत, रेल्वे स्टेशनवर तुफान मारामारी, तर कधी खतरनाक स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहायला नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक तरुणी धावत्या कारमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनवरुन ही दिल्लीमधील घटना असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हुल्लडबाजी करणे योग्य नसल्याचे म्हणत खडेबोल सुनावले आहेत.

हा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कन्व्हर्टिबल कारमध्ये उभी राहून एक तरुणी डान्स करताना दिसत आहे. ही कार रस्त्यावरुन धावत आहे. तरीही जीवाची पर्वा न करता तिचा बिंधास्तपणे डान्स सुरू आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी अशा हुल्लबाजांवर कारवाई करावी... अशी ही मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT