VIDEO VIRAL Saam TV
व्हायरल न्यूज

VIDEO VIRAL : धावत्या बाईकवर तरुणाने केला डान्स; तोल गेला अन् तोंडावर जोरदार आपटला...

Video: डीजे आणि त्यातली गाणी ऐकून हे दोन्ही तरुण काहीतरी अतरंगी करण्याचा विचार करतात. डीजेच्या तालावर नाचण्यासाठी दोघेही धावत्या बाईकवर उभे राहतात. व्हिडिओमध्ये तरुणांनी धावत्या बाईकवर केलेली स्टंटबाजी त्यांच्या चांगलीच अंगलट आलीये.

Ruchika Jadhav

Bike Stunt Video :

सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडीओ पहायला मिळतात. अनेक तरुण वाहतुकीचे नियमन मोडतात. नियम मोडल्याने त्यांच्यासह अन्य व्यक्तींना देखील याचा फटका बसतो. अनेक विचित्र अपघात होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणांनी धावत्या बाईकवर केलेली स्टंटबाजी त्यांच्या चांगलीच अंगलट आलीये.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण एका धावत्या दुचाकीवरून प्रवास करत आहेत. त्यांच्या पुढे एक डीजेचा ट्रक चालला आहे. आता डीजे आणि त्यातली गाणी ऐकून हे दोन्ही तरुण काहीतरी अतरंगी करण्याचा विचार करतात. डीजेच्या तालावर नाचण्यासाठी दोघेही धावत्या बाईकवर उभे राहतात.

येथे उभे राहून ते दोघेही नाचू लागतात. त्यांच्या मागे आणखी एक व्यक्ती असतो जो त्याच्या कॅमेऱ्यात त्यांचा व्हिडीओ शूट करतो. आपला व्हिडीओ काढत आहेत. आता आपण सोशल मीडियावर आणखी हिट होणार या विचाराने मागे बसलेला तरुण आणखी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतो.

आता ही स्टंटबाजी त्याला चांगलीच महागात पडते. स्टंट करत तो. बेधुंद होऊन नाचायला सुरुवात करतो. तितक्यात त्याचा एक पाय रस्त्यावर टेकतो. रस्त्याला पाय लागल्याने त्याला स्वतःचा तोल सावरता येत नाही. त्यामुळे तो थेट तोंडावर आपटतो.

तरुणांच्या स्टंटबाजीचा हा व्हिडीओ @bhawani_bj_bubani या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. व्हिडिओ पोस्ट करत डीजे vs बाईक अपघात असं लिहिण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक कमेंट केल्यात. काहींनी तरुणाला चांगलीच अद्दल घडली असं लिहिलं आहे. तर काहींनी त्यावर राग व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Constipation Relief: उन्हाळ्यात वेळेवर पोट साफ होत नाही? कोमट पाण्यासोबत घ्या हा १ पदार्थ, पोट ५ मिनिटांत राहील शांत

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांची तब्बेत बिघडली, वृंदावनमधील पदयात्रा रद्द

Govinda : गोविंदाच्या इव्हेंटमध्ये राडा! बाउन्सरने धक्काबुक्की केल्याने वाद चिघळला, VIDEO व्हायरल

Chole Bharture Recipe: स्ट्रीट स्टाईल चमचमीत छोले भटुरे बनवायचेत; फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप रेसिपी

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

SCROLL FOR NEXT