Viral Video News Saamtv
व्हायरल न्यूज

Rain Viral Video: पठ्ठ्यांनी कहरच केला! मुसळधार पाऊस अन् तरुणांनी बाईकवर केली अंघोळ; व्हिडिओ तुफान व्हायरल...

Bath On Bike Viral Video: हे दोन तरुण वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर साबण लावून अंघोळ करत आहेत.

Gangappa Pujari

Viral Video News: सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी कोण काय करेल ह्याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर नेहमी नवनवे अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून कधी आश्चर्याचा धक्का बसतो, तर कधी हसायलाही येते.

सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये दोन तरुण भर-पावसात अंघोळ करताना दिसत आहेत. तरुणांचा हा प्रताप पाहून नेटकरीही चक्रावून गेले आहेत...

काय आहे व्हिडिओ...

सध्या देशात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असून अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या स्टाईलमध्ये पहिल्या पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच इंदोरमधील तरुण- तरुणीचा भर पावसात रोमँटिक डान्स (Romantic Dance) करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आता आणखी एक असाच नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये दोन तरुण मुसळधार पावसात गाडीवर बसून अंघोळ करताना दिसत आहेत. भर दिवसा शर्ट न घातला साबण लावून रस्त्यावर अंघोळ करताना हे तरुण दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) धो- धो पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. अशातच हे दोन तरुण वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर साबण लावून अंघोळ करत आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याही त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असलेले या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी फेमस होण्यासाठी लोक काहीही करतील म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. तर काही जणांनी या तरुणांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

दरम्यान, याआधीही उल्हासनगर (Ulhasnagar) भागातील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक कपल उन्हाचा कंटाळून पाण्याने स्कुटीवर आंघोळ करताना दिसून आले होते. त्यावरही नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या होत्या. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT