Mumbai Railway TC: गेल्या काही वर्षापासून परप्रांतिय आणि मराठी भाषा हे वाद मोठ्या प्रमाणात निर्दशनास येत आहे. मात्र सर्व समोर येत असलेल्या या घटना मुंबई शहरातील असल्याचे दिसत आहे. त्यात सोशल मीडियावर मुंबईमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात पश्चिम रेल्वेच्या टीसीने मराठी माणसाला धमकावत मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही असा लेखी माफीनाफा लिहून घेतला आहे. सध्या हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणात या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे.
व्हायरल (Viral) होत असलेल्या घटनेत नालासोपारा स्टेशनवरुन जात असलेल्या अमित पाटील या प्रवाशाला त्याच रेल्वे स्टेशनवर असलेल्या रितेश मौर्या या टीसीने रेल्वे तिकीट दाखवण्यास सांगितल त्यानंतर अमित पाटील प्रवाशाने आपल्याला हिंदी येत नसून कृपया मराठीत बोला असे टीसीला सांगितले मात्र मुजोर रितेश मौर्या या टिसीने मराठी (Marathi) बोलण्यास नकार दिला आणि प्रवाशासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर पोलिसांनीही बोलावून अमित पाटील या प्रवाशाला धमकावण्यातही आले असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर प्रवाशाकडून यानंतर मी मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही, मराठी भाषेची मागणी करणार नाही असं लिहून घेतल.
घडलेल्या सर्व घटनेनंतर माफी नामा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर प्रकरण आल्यानंतर सोशल टीसी रितेश मौर्या या प्रकरणी दोषी आढळला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करु असं आश्वासन पश्चिम रेल्वेने दिलेले आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.