Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आरारारा खतरनाक! नागीण डान्स काही क्षण खरंच वाटला; तरुणाला नाचताना बघून नजर हटणारच नाही

Dance Viral Video: सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने नागीण डान्स केलेला आहे. नक्की डान्स का फेमस झाला ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Dance Video: सोशल मीडियावर कायम अतंरगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कोणत्या ठिकाणी झालेल्या हाणामारीचे तर कधी डोळ्यात अश्रु आणणारे. मात्र अनेकदा डान्सचे अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात की जे पाहून अक्षरशा: हसू आवरत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका तरुणाने हटके डान्स केलेला आहे, जो पाहून तुमची नजर हटणारच नाही.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, सर्व मेंहदीचा कार्यक्रम सुरु आहे. या क्रार्यक्रमानिमित्ताने अनेक घरातील सदस्य मंडपात जमलेली आहेत, अशातच डान्सचा कार्यक्रम सुरु असतो मात्र त्यातही डान्स(Dance) करण्यासाठी एक तरुण येतो आणि नागिन डान्स करण्यासाठी सुरुवात करतो. मात्र व्हिडिओच्या सुरुवातीस पासून ते शेवटपर्यंत तरुणाने हटके असा डान्स केलेला आहे. जो पाहून तिथे असलेला प्रत्येकजण पोट धरुन हसत आहे. तरुणाचा अतरंगी डान्स व्हिडिओ तिथे असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरील ''mr_aadi_rathore1'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लाखो नेटकऱ्यांनी पाहिला असून असंख्य प्रतिक्रियाही व्हिडिओला मिळाल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''माझ्या मित्रा, तू पूर्णपणे पात्रात उतरुन नाचत आहेस'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''त्या माणसाने खूप मेहनत घेतली आहे'', अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्र्यांचे शिवसेना उमेदवार, प्रवक्ते आणि नेते पदाधिकाऱ्यांना पत्र

Soyabean Price : सोयाबीनच्या आर्द्रतेची मर्यादा वाढवली; शेतकऱ्यांना होणार फायदा

Tulsi Plant: तुळशीचे रोप हिवाळ्यात सुकत असेल तर करा 'या' ५ टिप्स फॉलो

Maharashtra Politics: शरद पवारांना मी सोडलं नाही.., अजित पवारांचे बारामतीत मोठं विधान

Ahilyanagar News : जम्मू- काश्मीरमधील ९ जण ताब्यात; बनावट बंदूक परवाना घेत करायचे सुरक्षा रक्षकाची नोकरी

SCROLL FOR NEXT