Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: रस्त्यावर बांगड्या विकणारी महिला बोलतेय फाडफाड इंग्लिश; तुम्हालाही लाजवेल असा VIDEO व्हायरल

Woman Viral Video: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील महिला ही एक बांगडी विकणारी आहे आणि तिचाच जबरदस्त इंग्लिश बोलतानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Goa Viral Video

अनेकदा आपणही समोरच्याच्या रंग तसेत रुप पाहून त्या व्यक्तीला अडाणी समजत असतो परंतू कधीही समोरच्याचा रंग,रुप आणि कपडे पाहून आपण कधीही समोरच्याच्या व्यक्तीबद्दल गैरसमज करुन घेणं टाळले पाहिजे.सध्या सोशल मीडियावर याचे उत्तम उदाहरण देणारा एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील महिला ही एक बांगडी विकणारी आहे आणि तिचाच जबरदस्त इंग्लिश बोलतानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेकांना इंग्लिश भाषा बोलायला सांगितलं की,त्यांची चांगलीच भंबेरी उडते. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्वत:चा टिकाव लागावा यासाठी आपण काही व्यक्तींना तोडकं मोडकं तरी का होईना इंग्लिश बोलताना पाहिलं आहे.बऱ्याचदा देशी स्वॅगमध्ये मध्ये इंग्लिश भाषा बोलण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. परंतू या महिलेचे इंग्लिश भाषेवर असलेले प्रभुत्व पाहून अनेक नेटकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ गोव्यातील असल्याचे समजते अन् व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आपल्याला दिसते की, एक बांगडी विकणारी महिला वाळूवर बसलेली आहे. तिच्या हातामध्ये काही बांगड्याही दिसून येत आहेत. गोव्याला आलेल्या एका पर्यटकासोबत तिचा काही संवाद सुरु आहे. यात पर्यटक तिला गोव्यात झालेले बदल विचारत असतो. मग महिला कोविडनंतर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर झालेल्या बदलाविषयी इंग्लिशमधून अगदी व्यवस्थित सांगत असते.

या महिलेचा व्हिडिओ @der_alpha_mannchen या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून १४ लाखपर्यंतचे लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,' या महिला आमच्यापेक्षा उत्तम इंग्लिश बोलत आहेत' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,' याच्या इंग्लिश भाषेवर असलेल्या प्रभुत्व पाहून माझ्या शिक्षणावर शंका येते'.अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धुळ्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु

Cobra Rescue : सरपटत गेला अन् बियरच्या कॅनमध्ये अडकला; विषारी सापाच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Accident News : घरी परतताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू

Road Accident Prediction Device: चालकाला डुलकी आली तरी नाही होणार दुर्घटना; ब्रेक लावून कारही थांबेल

Vivo V60e: जबरदस्त बॅटरी अन् दमदार फीचर्ससह Vivo V60e भारतात लाँच; किंमत किती?

SCROLL FOR NEXT