Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : दुचाकी चालवताना फोनवर बोलण्यासाठी देसी जुगाड; महिलेचं टॅलेंट पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

Viral Video : दुचाकी चालवताना फोन कानाला लावून बोलता येत नाही. त्यामुळे काही व्यक्ती खांद्यावर फोन ठेवतात आणि मान खांद्यावर ठेवून फोनवर बोलतात. असे फोनवर बोलताना अपघात होण्याची दाट शक्यता असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video:

सध्याच्या काळात लहानमुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आपल्याला मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करताना दिसते. मोबाईल तसेत इतर सोशल मीडिया ही काळाची गरज नसून माणसांना त्याचे व्यसन लागले आहे. मोबाईलच्या आहारी गेल्याने अनेक भयानक अपघात होत असतात त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

त्यातच सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात चक्क एका महिलेने गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याचा जुगाड शोधून काढलाय. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक महिला रस्त्यावरुन स्कुटी चालवताना दिसते. फक्त ती स्कुटी चालवत नसून तिने तिच्या कानाला एका कापडाने मोबाईल बांधला आहे आणि दोन्ही हातांनी स्कूटी चालवत आहे. महिलेने केलेला हा जूगाड रस्त्यावरु जात असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

महिलेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @_kirik_trolls या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. व्हायरल होत असलेला व्हिडिओ बेंगळुरूमधील असल्याचे समजलेय. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, अशा लोकांमुळे अपघात होतात, तर आणखी यूजर्सनी महिलेच्या या कृतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तर आणखी एका यूजरने संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून असंख्य लाईक्स मिळत आहेत.

दुचाकी चालवताना फोन कानाला लावून बोलता येत नाही. त्यामुळे काही व्यक्ती खांद्यावर फोन ठेवतात आणि मान खांद्यावर ठेवून फोनवर बोलतात. असे फोनवर बोलताना अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या महिलेमे आपल्या डोक्याला एक कापड बांधलं आहे. हे कापड बांधून तिने यात आपला फोन कानाजवळ अडकवून घेतला आहे. अशा पद्धतीचा महिलेचा जुगाड पाहून काही नेटककऱ्यांनी तिला सलाम देखील केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, काय बोलणार?

Eknath Shinde : नोटीस कोणत्या अधिकाराने थांबवली? उच्च न्यायालयाचा एकनाथ शिंदेंना सवाल |VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Aishwarya Rai-Salman Khan Breakup : "तो भिंतीवर डोके आपटायचा..." लोकप्रिय दिग्दर्शकाचं ऐश्वर्या-सलमानच्या नात्यावर विधान

चकमकीत आरोपीकडून पोलिसांवर हल्ला, गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू, हल्लेखोराला संपवलं

SCROLL FOR NEXT